Guru Nakshatra Parivartan 2024 : ज्योतिषशास्त्रात ९ ग्रहाचे वर्णन केले आहे. नवग्रहातील प्रत्येक ग्रह राशी आणि नक्षत्र परिवर्तन करून आपले स्थान बदलत असतात. ग्रहाचे राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन याला संक्रमण म्हणतात. या संक्रमणामुळे सर्व राशींवर चांगला किंवा वाईट प्रभाव पडतो.
वैदिक ज्योतिषशास्त्रात देवगुरु गुरूचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. सध्या बृहस्पति वृषभ राशीत आहे. गुरूची हालचाल वेळोवेळी बदलत राहते. ज्याप्रमाणे गुरूची राशी बदलते, त्याचप्रमाणे नक्षत्रही ठराविक वेळी बदलते. मंगळवार, २० ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी गुरु ग्रह मृगाशिरा नक्षत्रात प्रवेश करत आहे. गुरु २७ नोव्हेंबरपर्यंत (सुमारे १०० दिवस) या नक्षत्रात राहील आणि त्यानंतर २८ नोव्हेंबरला रोहिणी नक्षत्रात प्रवेश करेल. मृगशिरा नक्षत्राचा स्वामी ग्रह मंगळ आहे. मंगळ आणि बृहस्पति यांच्यातील मैत्रीच्या भावनेमुळे, गुरूच्या नक्षत्रात होणारा बदल काही राशींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. जाणून घ्या या राशींबद्दल-
मेष राशीच्या लोकांसाठी गुरू ग्रहाचे नक्षत्र बदल खूप शुभ असणार आहे. नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला काही महत्त्वाच्या कामात यश मिळू शकते. जे आवश्यक असेल ते उपलब्ध होईल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्ही आर्थिकदृष्ट्या चांगले काम कराल. धनसंचय करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी हा काळ फार चांगला आहे.
वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरू ग्रहाचे संक्रमण शुभ राहील. या काळात तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. नोकरीतील तुमच्या कामगिरीने वरिष्ठ खूश होतील आणि तुम्हाला पदोन्नतीसह पगार वाढ होऊ शकते. उत्पन्न वाढू शकते. व्यावसायिकांसाठी हा काळ अनुकूल आहे. या काळात काही लोकांचे विवाह देखील ठरू शकतात.
कन्या राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहाचे नक्षत्र बदल शुभ राहील. व्यापाऱ्यांना विस्तारासह पैसे कमविण्याचे नवीन साधन मिळेल. रखडलेल्या कामात यश मिळू शकते. भौतिक सुखसोयी आणि संपत्तीत वाढ होईल. वैवाहिक जीवन पूर्वीपेक्षा अधिक आनंदी होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळू शकते. तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हाल.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)