वैदिक शास्त्रानुसार ज्योतिषअभ्यासात ग्रह अत्यंत महत्वाचे आहेत. यामध्ये एकूण ९ ग्रह कार्यरत असतात. ग्रह एका ठराविक वेळेला आपले स्थान बदलत असतात. ग्रहांच्या या हालचालींमधून राशीचक्रातील बाराही राशींचे भविष्य घडत असते. त्यामुळेच ग्रहांच्या स्थान बदलला शास्त्रात महत्वाचे स्थान आहे. ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतात. या गोचरमधून विविध शुभ-अशुभ योग निर्माण होतात. या योगांचा थेट परिणाम बाराही राशींवर होतो. काही राशींना याचा नकारात्मक परिणाम प्राप्त होतो तर काहींना अगदी शुभ-सकारात्मक परिणाम मिळतो.
ग्रह ज्याप्रमाणे राशी परिवर्तन करतात त्याचप्रमाणे ग्रह नक्षत्र परिवर्तनदेखील करत असतात. ग्रह एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात गोचर करतात. दरम्यान सर्वात शुभ समजला जाणारा ग्रह गुरु शुक्राच्या नक्षत्रात प्रवेश करणार आहे. अर्थातच गुरु रोहिणी नक्षत्रात गोचर करत आहे. विशेष म्हणजे गुरु तब्बल १२ वर्षांनंतर रोहिणी नक्षत्रात विराजमान होणार आहे. यातून शुभ संयोग जुळून येणार आहे. याचा फायदा काही राशींना मिळणार आहे. या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया.
वृषभ राशीच्या लोकांना गुरूच्या नक्षत्र परिवर्तनाचा विशेष लाभ मिळणार आहे. कारण गुरु वृषभ राशीतच विराजमान असणार आहे. याकाळात तुमच्या कमाईत प्रचंड वाढ होईल. आर्थिक आवक वाढल्याने आर्थिक स्थिती भक्कम होईल. मन आनंदी आणि उत्साही राहील. तुमच्या कार्यपद्धतीत पूर्वीपेक्षा अधिक गती निर्माण होईल. शिवाय वरिष्ठांवर तुमच्या कामाचा प्रभाव पडेल. तुमच्या कार्यशैलीचे कौतुक होईल. एखाद्या प्रॉपर्टीमध्ये अथवा शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक करण्यासाठी काळ उत्तम आहे.
सिंह राशीच्या लोकांना गुरूच्या रोहिणी नक्षत्रात प्रवेशाने फायदा होणार आहे. याकाळात तुमच्या कामात वेगाने प्रगती होईल. उद्योग-व्यवसायाचा विस्तार होईल. विविध मार्गाने आर्थिक लाभ होतील. करिअरमध्ये अनेक नव्या संधी उपलब्ध होतील. नोकरीमध्ये बढती किंवा पगारवाढ मिळण्याचा योग आहे. अप्रत्यक्ष लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी समाधानी राहील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांना जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. नवे कार्य सुरु करण्यासाठी हा काळ अगदी उत्तम आहे.
गुरु गोचर कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. याकाळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आर्थिक आवक प्रचंड वाढेल. नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढ मिळेल. तुम्हाला लव्ह लाईफच्या दृष्टिकोनातून अनेक सुखद अनुभव येतील. तुमच्या आनंदात आणि प्रेमात प्रचंड वाढ होईल. या राशीच्या लोकांच्या लव्ह लाईफमधील प्रेम वाढत जाऊन लव्ह लाईफ बहरणार आहे. लव्ह पार्टनर एकमेकांना अचानक सरप्राईज देण्याचा योग आहे. यातून एकेमकांबाबत प्रेम आणि आदर वाढेल. काही प्रेमीयुगल आज नात्याला लग्नपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करतील.