Guru Grah Gochar 2024: ज्योतिषशास्त्रात ग्रह-नक्षत्रांना अनन्यसाधारण महत्व आहे. यामध्ये एकूण ९ ग्रह असतात. ग्रह एका ठराविक काळानंतर आपले राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन करत असतात. त्यांच्या या हालचालींमधून विविध शुभ-अशुभ योग जुळून येत असतात. या योगांचा परिणाम राशीचक्रातील १२ राशींवर पडत असतो. ग्रहांचा शुभ प्रभाव असेल तर, त्या राशीला आयुष्यात सकारात्मक प्रभाव पाहायला मिळतात. मात्र, ग्रह अशुभ स्थानातून भ्रमण करत असतील तर, त्या राशींवर नकारात्मक परिणाम दिसून येतात.
ज्योतिषशास्त्रात स्थित असलेल्या नऊ ग्रहांमध्ये देवगुरु बृहस्पतीला प्रचंड महत्व आहे. त्यामुळेच या ग्रहाचे राशीपरिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन अतिशय खास असते. देवगुरु बृहस्पतीने नुकतेच नक्षत्र परिवर्तन केले आहे. बृहस्पतीचे हे परिवर्तन कोणत्या राशींवर प्रभाव टाकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसेच, बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रहाच्या या नक्षत्र बदलाचा राशींवर सकारत्मक प्रभाव पडणार की नकारात्मक? तसेच किती काळासाठी हा प्रभाव असणार आहे? या सर्व गोष्टी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
१३ जून २०२४ रोजी देवगुरु बृहस्पतीने नक्षत्र परिवर्तन करत रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला आहे. जेव्हा एखादा ग्रह नक्षत्र परिवर्तन करतो, तेव्हा त्या नक्षत्राबाबत जाणून घेणे गरजेचे असते. शास्त्रानुसार, रोहिणी नक्षत्र चंद्राचे अत्यंत प्रिय नक्षत्र आहे. तसेच, साधूसंतांच्या मते या नक्षत्रात ब्रह्म देवाचे निवासस्थान असते. तर, दुसरीकडे देवगुरु बृहस्पतीला ज्ञान, बुद्धी, विद्या, सुखसमृद्धी, विवेक, अध्यात्म आणि धन यांचा कारक ग्रह समजला जातो.
देवगुरु बृहस्पतीने १३ जून २०२४ रोजी नक्षत्र परिवर्तन करत रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला आहे. सकाळी ६ वाजून २७ मिनिटांनी हे नक्षत्र परिवर्तन झाले. गुरु रोहिणी नक्षत्रात तब्बल सव्वा सात महिने विराजमान असणार आहे. गुरु दोन टप्प्यात या नक्षत्रात राहणार आहे. पहिला टप्पा झाल्यानंतर पुन्हा ९ आठवडे गुरु या नक्षत्रात विराजमान असणार आहे. त्यांनंतर, मात्र गुरु आपली वक्री चाल करत, पुन्हा आहे त्या नक्षत्रामध्ये परतणार आहे.
ज्योतिष अभ्यासानुसार, देवगुरु बृहस्पतीच्या नक्षत्र बदलाचा अत्यंत शुभ प्रभाव काही क्षेत्रांवर पडणार आहे. हा काळ त्यांच्यासाठी फायद्याचा आणि समाधानाचा असणार आहे. गुरुच्या रोहिणी नक्षत्रात प्रवेशाने बँकिंग आणि फायनान्स, शेतीशी संबंधित क्षेत्र, लॉजिस्टिक अँड ट्रान्सपोर्ट, सी ट्रान्सपोर्ट, रोड ट्रान्सपोर्ट, रेल्वे अँड एयरपोर्ट नेटवर्क, हॉटेल इंडस्ट्री, टुरिझम, ऑटोमोबाईल, फूड प्रोसेसिंग, फूड ट्रान्सपोर्ट, फूड डिस्ट्रिब्युशन, जेम्स अँड ज्वेलरी या सर्व क्षेत्रांवर उत्तम प्रभाव पडणार आहे. या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांसाठी हा सुवर्णकाळ ठरु शकतो. या क्षेत्रात आर्थिक फायदा तर होईलच, शिवाय मानसन्मान आणि पदप्रतिष्ठा मिळण्याससुद्धा मदत होणार आहे.
याकाळात दररोज “ॐ नम: शिवाय” या मंत्राची एक माळ जप करणे अत्यंत लाभदायक असणार आहे. तसेच, महादेव मंदिरात जाऊन किंवा घरी महादेवाच्या मूर्तीसमोर “ॐ हराय नम:। ॐ महेश्वराय नम:। ॐ पिनाकधृते नम:। ॐ शंकराय नम:। ॐ पशुपतये नम:। ॐ शिवाय नम:। ॐ महादेवाय नम:।“ या मंत्राचा जप करावा. तसेच, याकाळात धार्मिक-अध्यात्मिक पुस्तकांचे दान करावे, गर्भवती महिलांना मदत करावी, जोडीदाराचा सन्मान करावा, वृक्ष लागवड करावी, धन दान करावे, गौशाळेत जाऊन सेवा करावी. या सर्व गोष्टीनी रोहिणी नक्षत्रात असलेला गुरु शुभ लाभ देईल.
संबंधित बातम्या