Gupt Navratri : गुप्त नवरात्रीत राशीनुसार करा या गोष्टी; आर्थिक संकट दूर होणार, सुख-संपत्ती लाभणार
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Gupt Navratri : गुप्त नवरात्रीत राशीनुसार करा या गोष्टी; आर्थिक संकट दूर होणार, सुख-संपत्ती लाभणार

Gupt Navratri : गुप्त नवरात्रीत राशीनुसार करा या गोष्टी; आर्थिक संकट दूर होणार, सुख-संपत्ती लाभणार

Jan 30, 2025 10:51 AM IST

Gupt Navratri Remedy In Marathi : यावर्षी गुप्त नवरात्रीचे व्रत ३० जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. असे मानले जाते की, काही उपाय केल्याने दुर्गा मातेच्या आशीर्वादासह सुख आणि समृद्धीदेखील वाढते. जाणून घ्या तुमच्या राशीनुसार काय करावे ते.

गुप्त नवरात्री राशीनुसार उपाय
गुप्त नवरात्री राशीनुसार उपाय

Gupt Navratri 2025 : माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून गुप्त नवरात्रीची सुरुवात होईल. यानिमित्ताने नऊ दिवस मातेचे भक्त विशेष पूजा करणार आहेत. या नवरात्रात तंत्र-मंत्र आणि सिद्धी प्राप्तीसाठी भक्त देवीच्या विविध रूपांची विशेष पूजा करतात. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात ३० जानेवारीपासून सुरू होणारी ही नवरात्र ७ फेब्रुवारीला संपणार आहे. 

नवरात्र सनातन धर्मात वर्षातून चार वेळा साजरी केली जाते. चैत्र आणि आश्विन महिन्यात साजरी होणारी नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी होते. तर माघ महिना आणि आषाढ महिन्यात साजऱ्या होणाऱ्या नवरात्रीला गुप्त नवरात्र असे म्हणतात.

हिंदू कॅलेंडरनुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी २९ जानेवारीला संध्याकाळी ६.०२ वाजता सुरू होईल. तर ३० जानेवारीला संध्याकाळी ४:०७ वाजता संपेल. उदया तिथीनुसार ३० जानेवारी गुरुवारपासून गुप्त नवरात्रीला सुरुवात होणार आहे.

गुप्त नवरात्रीमध्ये भाविकांनी आपल्या राशीनुसार मातेची पूजा-अर्चना केल्यास त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. तुमच्या राशीनुसार काय करावे जाणून घ्या पूजा पद्धत.

मेष ते मीन राशीच्या लोकांनी हे उपाय करावेत -

मेष - नवरात्रीच्या दिवशी नऊ मुलींना लाल ओढणी आणि मिठाई भेट दिल्याने धनाशी संबंधित समस्या दूर होतील.

वृषभ - मातृदेवतेची उपासना आणि दुर्गा चालिसाचे रोज पठण केल्याने सुख-शांती लाभेल.

मिथुन - हिरवी ओढणी आणि हिरव्या बांगड्या अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होईल.

कर्क - आर्थिक लाभासाठी गुप्त नवरात्रीमध्ये हवन करा आणि खीर-मध अर्पण करा.

सिंह - जीवनात सकारात्मक उर्जेसाठी दुर्गा मातेच्या नवर्णमंत्राचा जप करा.

कन्या - कुटुंबात सुखी राहण्यासाठी नऊ दिवस दुर्गा चालिसाचे पठण करा.

तूळ - विविध समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी नारळ अर्पण करून गरिबांना दान करा.

वृश्चिक - जीवनात सुखासाठी नवरात्रीमध्ये हनुमानाला विळ्याचे पान अर्पण करा.

धनु - जीवनातील सुख-शांतीसाठी दुर्गाला २१ गोमती चक्र आणि तीन नारळ अर्पण करा.

मकर - सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शिवलिंगाला लवंग अर्पण करा.

कुंभ - सुख-समृद्धीसाठी नऊ दिवस दुर्गा चालिसाचे पठण करा.

मीन - दुर्गादेवीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण करा.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner