मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  July Gochar : जुलै महिन्यात कर्क राशीत ३ ग्रहांचा भरेल खास मेळा, या राशीच्या लोकांना लाभाचा काळ

July Gochar : जुलै महिन्यात कर्क राशीत ३ ग्रहांचा भरेल खास मेळा, या राशीच्या लोकांना लाभाचा काळ

Jun 23, 2024 01:05 PM IST

Sun Mercury Venus Transit July 2024 : जुलै महिन्यात कर्क राशीत ग्रहांचा मेळा भरणार आहे. सूर्य, बुध आणि शुक्र मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करतील. सूर्य, बुध आणि शुक्र एकाच राशीत असल्यामुळे काही राशीच्या लोकांचे नशीब सूर्यासारखे चमकणार आहे.

जुलै महिन्यातील ग्रहांच्या संक्रमणाचा राशींवर प्रभाव
जुलै महिन्यातील ग्रहांच्या संक्रमणाचा राशींवर प्रभाव

July 2024 Surya, Budh, Shukra Gochar : ज्योतिष शास्त्रात ग्रहांचा संयोग फार महत्वाचा मानला जातो. ग्रहांचा संयोग सर्व १२ राशींवर परिणाम करतो. काही राशींना शुभ परिणाम तर काही राशींना अशुभ परिणाम भोगावे लागतात. जुलै महिन्यात कर्क राशीत ग्रहांचा खास मेळा भरणार आहे. सूर्य, बुध आणि शुक्र ग्रह मिथुन राशीतून निघुन कर्क राशीत विराजमान होतील. सूर्य, बुध आणि शुक्र एकाच राशीत असल्यामुळे काही राशीच्या लोकांना नशीबाची नक्कीच साथ मिळेल. या राशीच्या लोकांचे नशीब सूर्यासारखे चमकणार आहे. 

बुध २९ जून रोजी कर्क राशीत संक्रमण करेल तर १९ जुलै पर्यंत याच राशीत विराजमान राहील. शुक्र ग्रह ७ जुलै रोजी कर्क राशीत संक्रमण करेल आणि ३१ जुलै पर्यंत याच राशीत विराजमान राहील. सूर्य ग्रह १६ जुलै रोजी कर्क राशीत संक्रमण करेल. अशात कर्क राशीत या तीनही ग्रहांचा मेळा भरणार आहे. सध्या हा मेळा मिथुन राशीत असल्यामुळे पुढील या राशींना लाभ होत आहे. चला जाणून घेऊया सूर्य, बुध आणि शुक्र एकाच राशीत असल्यामुळे कोणत्या राशींना फायदा होईल -

मेष-

मेष राशीच्या लोकांना जुलै महिन्यातील ग्रहांच्या संक्रमणाने लाभ होईल. या काळात तुम्हाला गुप्त शत्रूंपासून मुक्ती मिळेल. नोकरीच्या ठिकाणी यश मिळविण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील, परंतु यश नक्की मिळेल. जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. आर्थिक लाभ होईल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल.

मिथुन-

जुलै महिन्यातील संक्रमण कर्क राशीत होत असल्यामुळे, मिथुन राशीच्या लोकांसाठी हा संक्रमण काळ लाभदायक राहील. नोकरीच्या ठिकाणी उंची गाठाल. उत्पन्न वाढेल. सुखसोयींमध्ये वाढ होईल आणि फिरायला जाण्याचे बेत आखले जातील. आर्थिक समस्यांपासून दिलासा मिळेल.

सिंह- 

सिंह राशीच्या लोकांने जुलै महिन्यातील संक्रमणमामुळे भाग्याची चांगली साथ लाभेल. या काळात तुमचा मान-सन्मान वाढेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. जोडीदाराशी संबंध मधुर होतील. संक्रमण काळात समस्यांवर उपाय सापडतील. अडचणीचे निराकरण होईल. आरोग्याशी संबंधित समस्या कमी होतील आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे.

धनु-

सूर्य, बुध आणि शुक्र ग्रहाचे कर्क राशीतील संक्रमण धनु राशीच्या व्यक्तींना फायदेशीर ठरेल. या काळात तुम्ही जमीन किंवा वाहन खरेदी करू शकता. जमिनीत गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळू शकतो. धार्मिक कार्यात भाग घ्याल. जोडीदाराच्या सल्ल्याने तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel
विभाग