How to wear Gold: सोने हा सोनेरी रंगाचा धातू आहे. रत्नशास्त्रानुसार सोने धारण केल्याने गुरू ग्रह बळकट होऊ शकतो. कुंडलीतील ग्रहांची स्थिती आणि राशीनुसार रत्ने परिधान करावीत. सोनं परिधान करण्यासाठीही काही नियम आहेत. हे नियम पाळणे गरजेचे आहे. सोने योग्य विधी आणि योग्य पद्धतीने परिधान केल्यास फायदेशीर ठरते. सोने धारण केल्याने धनप्राप्ती, बालसुख प्राप्तीबरोबरच आयुष्यही चांगले राहते. चला तर मग, जाणून घेऊ या सोने कधी, कोणी आणि कसे परिधान करावे.
सोने हा धातू गुरूशी संबंधित असल्याने गुरुवारी सोने धारण करणे शुभ मानले जाते. त्याचबरोबर ते परिधान करण्यापूर्वी शुद्धीकरण करणे आवश्यक मानले जाते.
सोने अंगठी किंवा साखळीच्या स्वरूपात ठेवता येते. गंगाजल, दूध आणि मधाद्वारे प्रथम सोने शुद्ध करा. नंतर ते भगवान विष्णूच्या चरणी अर्पण करा. विधी करा आणि प्रार्थना करा. थोड्या वेळाने ते कोणत्याही बोटात घाला. मान्यतेनुसार रविवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी सोने धारण करणे अत्यंत शुभ मानले जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार मेष, कर्क, सिंह, धनु आणि मीन राशीचे लोक सोने धारण करू शकतात. त्याचबरोबर मकर, मिथुन, कुंभ आणि वृषभ राशीच्या लोकांनी सोने परिधान करू नये. कुंडलीतील गुरूची स्थिती पाहूनच सोने परिधान करावे. पोट आणि लठ्ठपणाशी संबंधित समस्यांमध्ये सोने धारण करणे टाळावे. सोने परिधान करण्यापूर्वी आपल्या ग्रहांची स्थिती अवश्य पाहावी आणि ज्योतिषाचा सल्ला घेणे योग्य ठरेल.
भारतीयांमध्ये सोन्याचे महत्त्व खोलवर रुजलेले आहे. हिंदू धर्मामध्ये सोने हा धर्माचा अविभाज्य असा भाग आहे. देवी देवतांच्या सोन्याच्या मूर्ती, देवांचे मुकूट, दागिने आणि मंदिराचे कळस सोन्याचे बलवणे भूषणावह समजले जाते. धार्मिक पूजापाठ करताना सोन्याच्या मूर्ती ठेवल्या जातात. तसेच शीख, जैन, बौद्ध किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये देखील सोने ही एक प्रमुख संपत्ती आहे.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या