Gochar in december : सरत्या वर्षाचा, म्हणजेच २०२३ चा डिसेंबर महिना अनेकार्थांनी वेगळा असणार आहे. या महिन्यात सूर्यमालेतील अनेक मोठे ग्रह आपापलं स्थान बदलणार असून नव्या राशीत प्रवेश करणार आहेत. या राशी परिवर्तनाचा राशीचक्रातील सर्व राशींवर थेट परिणाम होणार आहे.
डिसेंबर महिन्यात बुध, गुरू, शुक्र, सूर्य आणि मंगळ हे ग्रह आपली चाल बदलणार आहेत. या घडामोडींमुळं काही राशींना फायदा होऊ शकतो तर काहींच्या पुढं अनेक अडचणी उभ्या राहू शकतात. राशी परिवर्तनाची घडामोड नेमकी कोणत्या राशींसाठी भाग्यदायी ठरेल यावर नजर टाकूया…
ग्रहांचा राजा समजला जाणारा सूर्य १६ डिसेंबर रोजी राशी बदल करेल. सूर्य देव धनु राशीत प्रवेश करेल आणि त्यानंतरच एक महिना याच राशीत राहील. मीन, मेष आणि धनु राशीच्या लोकांसाठी सूर्याचं हे परिवर्तन फायदेशीर ठरू शकते.
बुध ग्रह २८ डिसेंबर रोजी आपली चाल बदलेल. बुध सकाळी ११ वाजून ७ मिनिटांनी वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. मेष, धनु आणि मिथुन राशीच्या जातकांना बुध ग्रहाच्या गोचराचा लाभ होण्याची शक्यता आहे.
शुक्राच्या वास्तव्य स्थानातील बदल २५ डिसेंबरला होईल. या दिवशी सकाळी ६ वाजून ३३ मिनिटांनी शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल. या बदलामुळं सिंह, मकर आणि कर्क राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो.
गुरूचं डिसेंबर महिन्यातील राशी परिवर्तन मिथुन, मेष, कर्क आणि वृषभ राशीच्या जातकांसाठी लाभदायी ठरू शकतं. डिसेंबरच्या शेवटच्या महिन्यात गुरू ग्रह मार्गी होणार आहे. वर्षाच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच ३१ डिसेंबर रोजी गुरू ग्रह मेष राशीत मार्गी होणार आहे.
मंगळ ग्रह २७ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी चाल बदलेल. तो धनु राशीत प्रवेश करेल. या राशी बदलाची शुभ फळे कर्क, मीन, तूळ आणि मेष राशीच्या जातकांना मिळू शकतात.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या