मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  July 2024 : जुलै महिन्यात तब्बल ४ ग्रह करणार गोचर! 'या' राशींना येणार अच्छे दिन, होणार पैसाच पैसा

July 2024 : जुलै महिन्यात तब्बल ४ ग्रह करणार गोचर! 'या' राशींना येणार अच्छे दिन, होणार पैसाच पैसा

Jun 26, 2024 09:12 AM IST

July 2024 Shukra Surya Budh Mangal Gochar : जुलै महिन्यात एक दोन नव्हे तर तब्बल ४ ग्रहांचे संक्रमण पाहायला मिळणार आहेत. पाहूया या ग्रहांच्या गोचर करण्याचा कालावधी नेमका काय असणार आहे.

जुलै महिन्यातील ग्रहांचे संक्रमण
जुलै महिन्यातील ग्रहांचे संक्रमण

ज्योतिषशास्त्रात प्रत्येक दिवस नवीन घडामोडींचा असतो. शास्त्रात नवग्रह कार्यरत आहेत. त्यामुळेच प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या ग्रहाचे स्थान बदलत असते. हे ग्रह एका ठराविक कालावधीत एका राशीतून दुसऱ्या राशीत राशीपरिवर्तन करत असतात. या प्रक्रियेला गोचर असे म्हटले जाते. महिनाभराच्या कालावधीत अनेक गोचर पाहायला मिळतात. येत्या जुलै महिन्यातसुद्धा अशाच महत्वाच्या घडामोडी घडणार आहेत. जुलै महिन्यात एक दोन नव्हे तर तब्बल ४ ग्रहांचे संक्रमण पाहायला मिळणार आहेत.

जुलै महिन्यात चार मोठे ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करणार आहेत. या गोचरमुळे अनेक शुभ-अशुभ योगसुद्धा जुळून येणार आहेत. या ग्रहांबाबत सांगायचे तर, मंगळ, शुक्र, बुध आणि सूर्य हे महत्वाचे ग्रह स्थान बदल करणार आहेत. या ग्रहांच्या हालचालींमधून घटित होणाऱ्या योगांचा परिणाम राशीचक्रातील बाराही राशींवर होणार आहे. यामध्ये काही राशींना सकारात्मक बदल पाहायला मिळतील तर काही राशींना नकारात्मक बदल पाहायला मिळतील. पाहूया या ग्रहांच्या गोचर करण्याचा कालावधी नेमका काय असणार आहे.

शुक्र

नवग्रहांपैकी एक अत्यंत महत्वाचा ग्रह म्हणजे शुक्र होय. शुक्राला सुख, समृद्धी, धन आणि सौंदर्याचा कारक ग्रह मानला जातो. शुक्राच्या स्वराशीतसुद्धा हे गुणधर्म पाहायला मिळतात. वैवाहिक आयुष्यात सुखसमृद्धी कायम ठेवण्यासाठी शुक्र ग्रह जबाबदार असते. कुंडलीत शुक्र ग्रह कमजोर असेल तर त्या राशीला आर्थिक आणि वैवाहिक बाबींमध्ये अडचणी संभवतात. त्यामुळेच शुक्र ग्रहाची प्रत्येक हालचाल महत्वाची असते. यानुसार शुक्र ७ जुलै रोजी पहाटे ४ वाजून ३९ मिनिटांनी कर्क राशीत गोचर करणार आहे.

मंगळ

जुलै महिन्यात मंगळ ग्रहसुद्धा गोचर करणार आहे. नवग्रहांमध्ये मंगळ ग्रहाला अनन्यसाधारण महत्व आहे. मंगळला ग्रहांचा सेनापती म्हणून संबोधले जाते. मंगळ ग्रह साहस, पराक्रम, योद्धा वृत्ती यासाठी कारक आहे. जेव्हा मंगळ ग्रहाची शुभ दृष्टी एखाद्या राशीवर असते तेव्हा त्या राशीची भरभराटी होते. परंतु कुंडलीत मंगळ ग्रह कमजोर असेल किंवा अशुभ स्थानावर असेल तर त्या राशीला प्रचंड त्रास सहन करावा लागतो. दरम्यान १२ जुलै २०२४ रोजी मंगळ शुक्राची स्वराशी असणाऱ्या वृषभ राशीत गोचर करणार आहे. सायंकाळी ७ वाजून १२ मिनिटांनी हे गोचर होईल.

सूर्य

नवग्रहात सूर्याला महत्वाचे स्थान आहे. सूर्याला ग्रहांचा देवता म्हटले जाते. त्यामुळेच सूर्य ग्रहाच्या हालचाली प्रत्येक राशीसाठी खास असतात. सूर्याला निडरपणा, तेज, ज्ञान, नेतृत्व यासाठी कारक मानले जाते. या ग्रहाचा प्रभाव ज्या राशींवर पडतो त्या राशीसुद्धा तितक्याच तेजस्वी बनतात. १६ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजून २९ मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे या राशीत आधीच बुधसुद्धा विराजमान असणार आहे. त्यामुळेच बुध आणि सूर्य एकत्र आल्याने 'बुधादित्य राजयोग' हा अत्यंत शुभ योग निर्माण होणार आहे. याचा लाभ काही राशींना मिळणार आहे.

बुध

बुध ग्रहालासुद्धा नवंग्रहात विशेष स्थान आहे. बुध ग्रह बुद्धी, चातुर्य, तठस्थपणा यासाठी कारक असतो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर असतो त्या लोकांना बौद्धिक गोष्टींमध्ये अडचणी निर्माण होतात. शिवाय आर्थिक बाबींमध्ये समस्या उद्भवतात. याउलट बुध ग्रह मजबूत असल्यास तुमच्या बौद्धिक क्षमतेचे कौतुक होते. नवनवीन कल्पना सुचतात. आर्थिक फायदे होतात. येत्या १९ जुलै रोजी बुध ग्रह सिंह राशीत गोचर करणार आहे. हे गोचर सकाळी ८ वाजून ४८ मिनिटांनी होणार आहे. या गोचरच्या निमित्ताने सूर्यासोबत बुधादित्य राजयोग जुळून येईल.

जुलै महिन्यात होणाऱ्या ग्रहांच्या गोचरमध्ये मेष, वृषभ, कन्या, मिथुन, सिंह, कर्क या राशी नशीबवान ठरणार आहेत. या राशींना गोचरचा लाभ मिळणार आहे. याकाळात त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर होऊन सुखसमृद्धी लाभेल. शिवाय विविध मार्गाने धनलाभ होऊन. आर्थिक स्थिती सुधारेल.

WhatsApp channel
विभाग