मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Swapna Shastra : 'अशी' स्वप्न देतात लवकर लग्न होण्याचे संकेत

Swapna Shastra : 'अशी' स्वप्न देतात लवकर लग्न होण्याचे संकेत

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
May 31, 2023 08:58 AM IST

Meaning Of Dreams : आज आपण अशा स्वप्नांबद्दल बोलणार आहोत जी स्वप्न पाहिल्यास तुम्हाला लग्न होण्याचे संकेत मिळतात.

अशी स्वप्न पाहाताच मिळतात लग्न होण्याचे संकेत
अशी स्वप्न पाहाताच मिळतात लग्न होण्याचे संकेत (HT)

आपल्या आसपास झालेल्या घटनाही आपल्याला स्वप्नात पाहायला मिळतात. स्वप्न ज्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीची असतात, त्याचप्रमाणे प्रत्येक स्वप्नाचा काहीतरी खास अर्थ दडलेला असतो असं स्वप्नशास्त्र सांगतं. आज आपण अशाच एका स्वप्नाबद्दल बोलणार आहोत.

आज आपण अशा स्वप्नांबद्दल बोलणार आहोत जी स्वप्न पाहिल्यास तुम्हाला लग्न होण्याचे संकेत मिळतात. कोणती आहेत ती स्वप्न आणि त्यांचा लग्नाशी काय संबंध हे आपण पाहाणार आहोत.

कोणती स्वप्न देतात लग्न होण्याचे संकेत?

जर एखाद्याने स्वप्नात अंगठी दिल्याचं आपण पाहिलं असेल तर हे स्वप्न भविष्यात त्याचा साथीदार त्याच्यावर खूप प्रेम करेल असं दर्शवतं.

जर तुम्ही तुमच्या स्वप्नात स्वतःला आनंदाने नाचताना पाहिलं तर स्वप्नशास्त्रानुसार या स्वप्नाचा अर्थ तुमचं लवकर लग्न होणार असल्याचं संकेत देणारं स्वप्न आहे हे सूचित करतं.

जर तुम्हाला स्वप्नात भरतकाम केलेले कपडे पाहायला मिळाले तर तुम्हाला भविष्यात एक सुंदर पत्नी मिळेल असा त्या स्वप्नाचा अर्थ होतो.

जर तुम्हाला स्वप्नात एखाद्या व्यक्तीकडून दागिने मिळाले तर तुचं लग्न एखाद्या श्रीमंत व्यक्तीशी होणार असल्याचं हे स्वप्न सांगतं.

जर तुम्हाला, तुम्ही स्वप्नात एखाद्या जत्रेत फिरताना पाहाच आहात तर हे लक्षण आहे की तुम्हाला लवकरच एक योग्य जीवनसाथी मिळणार आहे.

जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात दाढी करताना पाहात आहात तर ते स्वप्न सूचित करतं की तुमच्या लव्ह लाईफशी संबंधित समस्या लवकरच दूर होणार आहेत.

तुम्हाला तुमच्या स्वप्नात हिरा दिसला किंवा हिरेजडीत अलंकार दिसला तर हे स्वप्न मात्र अशुभ स्वप्न असणार आहे. तुमच्या वैवाहिक जीवनासाठी हे शुभ लक्षण नाही. हे स्वप्न सूचित करते की तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनाला इतरांच्या अशुभ प्रभावाखालून वाचवलं पाहिजे.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

विभाग