जोतिषशास्त्रात राशीभविष्य, अंकभविष्य प्रमाणेच रत्न शास्त्रसुद्धा प्रचलित आहे. सर्वसामन्यांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत अनेक लोक आपले आयुष्य सुखकर करण्यासाठी रत्नशास्त्राचा आधार घेतात. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर उपाय म्हणून रत्न शास्त्रात विविध रत्न सुचविण्यात आले आहेत. त्या-त्या व्यक्तीने ठराविक रत्न धारण केल्यास विशेष लाभ मिळतो किंवा फायदा होतो.
आपल्या आयुष्यात जोतिषशास्त्र हा महत्वाचा घटक आहे. यामध्ये राशीभविष्य, अंकशास्त्र, रत्न शास्त्र अशा अनेक बाबी आहेत. आज आपण रत्नशास्त्राबद्दल जाणून घेत आहोत. रत्न शास्त्रात आर्थिक, सामाजिक, राजकीय, वैवाहिक, आर्थिक अशा अनेक बाबतींत असणाऱ्या अडचणींवर उपाय सांगण्यात आले आहेत.
अनेक लोकांच्या खाजगी आयुष्यात अडचणी येत असतात. पैसा नोकरी सर्वकाही असूनसुद्धा त्यांचे वैवाहिक आयुष्य मात्र दुखी असते. पतिपत्नीमध्ये सतत वादविवाद किंवा मतभेद होत असतात. बहुतांश वेळा घटस्फोटासारखे प्रकारसुद्धा पाहायला मिळतात. अशावेळी अनेकजण रत्नशास्त्राचा आधार घेतात. काही रत्न आहे जे परीधान केल्याने वैवाहीक जीवन सुखी व आनंदी होते. जर तुमच्याही वैवाहिक आयुष्यात काही अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी काही खास रत्न धारण करण्याचा सल्ला रत्न शास्त्रात देण्यात आला आहे. पाहूया हे खास रत्न कोणते आहेत.
रोज क्वॉर्टज हे रत्न धारण केल्याने पतिपत्नीच्या नात्यात प्रेम आणि रोमान्स वाढीस लागते. एकमेकांबद्दल आपुलकी आणि ओढ निर्माण होते. त्यामुळे नातेसंबंध आणखी मजबूत होण्यास मदत होते. यामध्ये रोज क्वॉर्टजचे रत्न असलेल्या अंगठी किंवा इतर दागिनेसुद्धा तुम्ही धारण करु शकता.
एखाद्या जोडप्याचे नाते दीर्घकाळ टिकण्यासाठी हे रत्न विशेष फायदेशीर ठरते. हे रत्न धारण केल्यास तुमच्या वैवाहिक आयुष्यात सकारात्मक परिणाम दिसायला सुरु होतात.
नीलम हे रत्न वैवाहिक आयुष्यात सुखसमृद्धी निर्माण करण्यासाठी विशेष मदत करते. हे रत्न धारण केल्यास पतिपत्नीमधील प्रेम वाढते. हे रत्न जोडप्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यास मदत करते. एकमेकांवरील विश्वास वाढल्याने मतभेद दूर होतात.
वैवाहिक आयुष्यात सुखसमृद्धी आणि मनशांती राखण्यासाठी या रत्नाचा प्रचंड लाभ होतो. हे रत्न धारण केल्यास पतिपत्नीमध्ये भावनिक संबंध सुधारतात. प्रत्येक कार्यात एकमेकांचा पाठिंबा मिळतो.
पत्नीपत्नीच्या नात्यात प्रेम आणि ओढ निर्माण करण्यासाठी या रत्नाचा फायदा होतो. डायमंड या रत्नाला प्रेम, विश्वासाचे प्रतीक समजले जाते. हे रत्न धारण केल्याने वैवाहिक आयुष्य अधिक सुखकर होते.
संबंधित बातम्या