जोतिष शास्त्रात राशीभविष्य, अंक शास्त्राप्रमाणेच रत्न शास्त्रालादेखील अनन्यसाधारण महत्व आहे. या शास्त्रात आपले आयुष्य सुखद बनवण्यासाठी विशेष रत्नांचा आधार घेतला जातो. मनुष्याच्या विविध अडचणींवर या शास्त्रांमध्ये विविध रत्नांच्या वापराचा उल्लेख करण्यात आला आहे. त्या-त्या दोषांवर ते ठराविक रत्न धारण केल्याने विशेष लाभ मिळत असल्याची मान्यता आहे.
यामध्ये रत्न धारण करण्याची देखील एक विशेष पद्धत असते. एखाद्या व्यक्तीने उठून कोणतेही रत्न धारण करणे योग्य नसते. आपल्या नावानुसार, राशीनुसार, जन्मतारखेनुसार आणि विशेष म्हणजे आपल्या अडचणीनुसार हे रत्न ठरत असतात. या क्षेत्रातील तज्ञ आणि जोतिषांचा सल्ला घेऊन हे रत्न धारण करणे सोयीचे ठरते. एखाद्या व्यक्तीने योग्य रत्न धारण केल्यासच त्याला त्याचा पूर्ण लाभ मिळू शकतो. त्यामुळे शक्यतो तज्ञांच्या सल्ल्यानेच हे रत्न धारण करावे.
बहुतांश लोकांच्या आयुष्यावर विविध कारणांमुळे नकारात्मक प्रभाव पडलेला असतो. या नकारात्मक प्रभावामुळे त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच कमकुवत झालेला असतो. अनेकांना आयुष्यात फक्त निराशा आणि अपयशच सहन करावे लागत असतात. अशात अनेक लोक रत्न शास्त्राचा आधार घेतात. रत्न शास्त्रानुसार आयुष्यातील नकारात्मक गोष्टी दूर करण्यासाठी आणि त्यातून स्वतःचा बचाव करण्यासाठी एक खास रत्न उपयोगी पडते. या विशेष रत्नाला ब्लॅक स्टोन म्हटले जाते. ब्लॅक स्टोन धारण केल्याने आयुष्यातील निराशा आणि नकारात्मक गोष्टी नाहीशा होतात. त्यामुळे जगण्याला एक नवी उमेद मिळते.
१) ब्लॅक स्टोन चांदीच्या अंगठीत किंवा चेनमध्ये घडवून धारण करावे.
२)जवळपास हे रत्न ८ किंवा १० भारचे असणे गरजेचे आहे.
३) रत्न शास्त्रानुसार हे रत्न शनी नक्षत्र किंवा शनिवारच्या दिवशी संध्याकाळी धारण करणे योग्य असते.
४)या आभूषणाला सर्वप्रथम दूध आणि गंगाजलमध्ये शुद्ध करुन घ्यावे.
५)महत्वाचे म्हणजे रत्न धारण करण्यापूर्वी १०८ वेळा शनी देवाच्या बीज मंत्रांचा जप करणे लाभदायक असते.
रत्न शास्त्रानुसार, ब्लॅक स्टोन धारण करण्याने शनी प्रदोषापासून मुक्ती मिळते.
मान्यतेनुसार, हे रत्न धारण केल्याने जादूटोणा, वाईट नजर यांच्यापासून संरक्षण मिळते.
या रत्नामुळे कौटुंबिक, वैवाहिक वादविवाद दूर होऊन घरात आनंद आणि सुखसमृद्धी येते.
हे रत्न धारण केल्याने दुर्भाग्य दूर होऊन सौभाग्य प्राप्त होते.
ब्लॅक स्टोन धारण केल्याने वाईट विचार दूर होऊन अध्यात्मिक कार्यांत रुची वाढते.
जोतिष शास्त्रानुसार वृषभ, मिथुन, कन्या, तूळ, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी ब्लॅक स्टोन हे रत्न धारण केल्याने त्याचा सकारत्मक परिणाम दिसून येतो. मात्र मेष, कर्क, वृश्चिक, सिंह आणि मीन राशीच्या लोकांनी हे रत्न धारण करणे टाळावे.