रत्नशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीने विशेष रत्न धारण केल्यास त्याच्या कुंडलीतील दोष आणि समस्या दूर होण्यास मदत होते. सोबतच त्या व्यक्तीच्या आर्थिक आयुष्यातील, वैवाहिक आयुष्यातील, करिअरसंबंधी आणि विविध गोष्टींमधील अडचणी दूर करण्यास उपयोगी ठरते. शिवाय आयुष्यातील प्रत्येक गोष्टींमध्ये मनासारखे यश मिळण्यास सुरुवात होते. या शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीने आपापल्या राशीनुसार हे रत्न धारण करणे गरजेचे आहे. राशीनुसार रत्न धारण केल्यास त्याचा सकारत्मक परिणाम आयुष्यात पाहायला मिळतो. आज आपण कोणत्या राशीसाठी कोणते रत्न धारण करणे योग्य आहे हे पाहणार आहोत.
मेष- मेष राशीच्या लोकांनी डायमंड धारण करणे फायद्याचे असते. हे रत्न तुमच्यातील आत्मविश्वास, नेतृत्व आणि कलागुणांना वाव देते. त्यामुळे तुम्हाला आर्थिक आणि मानसिक स्थैर्य लाभते.
वृषभ- वृषभ राशीच्या लोकांनी पाचू हे रत्न धारण करावे. या रत्नाने तुमच्या आयुष्यातील अडचणी तर दूर होतातच शिवाय तुमचे नशीब उघडते. तुमची वेगाने प्रगती होते आणि आर्थिक लाभसुद्धा मिळतो.
मिथुन- मिथुन राशीच्या लोकांनी हकीक रत्न धारण केल्याने प्रचंड लाभ होतो. हे रत्न तुमची बौद्धिक आणि मानसिक क्षमता वाढवण्यास मदत करते. तसेच करिअरमधील अडचणी दूर करते.
कर्क- कर्क राशीच्या लोकांनी मून स्टोन धारण केल्यास विशेष फायदा मिळतो. हे रत्न तुम्हाला भावनिकदृष्ट्या सक्षम आणि मजबूत बनवते. तसेच कार्यक्षेत्रात उंची गाठण्यास मदत करते.
सिंह- सिंह राशीच्या लोकांनी रुबी रत्न धारण करावे. हे रत्न धैर्य, संयम आणि उत्साहाचे प्रतीक समजले जाते. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील निराशा दूर होऊन आनंद मिळते.
कन्या- कन्या राशीच्या लोकांनी नीलम हे रत्न धारण करावे. रत्न शास्त्रानुसार हे रत्न बुद्धीमत्ता आणि मानसिक धैर्याचे प्रतीक आहे. या गुणधर्मांमुळे तुम्हाला आयुष्यात विशेष लाभ मिळतो.
तूळ- तूळ राशीच्या लोकांनी ओपल रत्न वापरल्यास विशेष प्रभाव दिसून येतो. या रत्नामध्ये प्रेम, शांती, स्नेह हे गुणधर्म असतात. त्यामुळे तुमच्या खाजगी आयुष्यात प्रेम आणि सुखसमृद्धी वाढत राहते.
वृश्चिक- वृश्चिक राशीच्या लोकांनी गार्नेट हे रत्न धारण करावे. हे रत्न शक्ती, ऊर्जा आणि शौर्याचे प्रतीक आहे. या रत्नाच्या वापराने तुमच्या आयुष्यातील नकारत्मक ऊर्जा दूर होते.
धनु- धनु राशीच्या लोकांनी पुखराज या रत्नाचा वापर करावा. हे रत्न धारण केल्याने तुमच्यात विश्वास, सामंजस्य, बुद्धिमत्ता, सत्यवादीपणा अशा गुणांना चालना देते. आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारत्मक गोष्टी घडू लागतात.
मकर- मकर राशीच्या लोकांनी जमुनिया हे नीलमसारखे दिसणारे रत्न धारण करावे. या रत्नामुळे तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. तसेच आर्थिक प्रगती दिसून येईल.
कुंभ- कुंभ राशीच्या लोकांनी एक्वामरीन हे रत्न धारण करावे. या रत्नाला संभाषण आणि नावीन्याचे प्रतीक मानले जाते. हे रत्न धारण केल्यास तुमचा वैचारिक दृष्टिकोन मजबूत होऊन सकारत्मक बदल घडून येतो.
मीन- मीन राशीच्या लोकांनी जेड स्टोन धारण करणे फायद्याचे ठरते. या रत्नाला सुख, समृद्धी, शांती आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते. या रत्नाला धारण केल्याने तुमच्या आयुष्यात स्थैर्य येते आणि सर्व बाजूनी प्रगती होण्यास मदत होते.