मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Gemstone For Career : नोकरी-व्यवसायात यश प्राप्तीसाठी धारण करा हे रत्न! होईल चमत्कार

Gemstone For Career : नोकरी-व्यवसायात यश प्राप्तीसाठी धारण करा हे रत्न! होईल चमत्कार

HT Marathi Desk HT Marathi
May 31, 2024 11:56 AM IST

Which Gemstone Should Be Used For Career : रत्न शास्त्रानुसार प्रत्येक समस्येसाठी त्या-त्या राशीच्या लोकांना विविध रत्ने सुचवली जातात. विशेष म्हणजे विविध कारणांसाठी विविध प्रकारची रत्न उपलब्ध असतात.

Gemstone For Career : नोकरी-व्यवसायात यश प्राप्तीसाठी धारण करा हे रत्न! होईल चमत्कार
Gemstone For Career : नोकरी-व्यवसायात यश प्राप्तीसाठी धारण करा हे रत्न! होईल चमत्कार

Which gemstone should be used for career : अंकशास्त्राप्रमाणेच रत्नशास्त्रसुद्धा जोतिषशास्त्रातील अतिशय महत्वाचा भाग आहे. रत्न शास्त्रात लोकांच्या आयुष्यात सुख,समृद्धी,स्थिरता आणि उत्तम आरोग्य मिळवण्यासाठी काही विशेष रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. हे रत्न धारण केल्याने आपल्या आयुष्यात असलेल्या अडचणी दूर होतात, आर्थिक स्थिती सुधारते, करिअरमध्ये यश मिळत असल्याची मान्यता आहे. त्यामुळे अनेक लोक आपल्या हातात जोतिषांच्या सल्ल्यानुसार असे रत्न धारण करत असतात.

रत्न शास्त्रानुसार प्रत्येक समस्येसाठी त्या-त्या राशीच्या लोकांना विविध रत्ने सुचवली जातात. विशेष म्हणजे विविध कारणांसाठी विविध प्रकारची रत्न उपलब्ध असतात. जोतिषांच्या सल्ल्यानुसार योग्य कारणासाठी योग्य ते रत्न धारण केल्यासच त्याचा सकारत्मक प्रभाव आपल्यावर पडतो. ज्या लोकांना उद्योग-व्यवसायात किंवा नोकरींमध्ये सतत अडचणी येत आहेत,अशा लोकांसाठी काही खास रत्न यामध्ये सुचविण्यात आली आहेत. पाहूया ते रत्न नेमके कोणते आहेत.

सिट्रिन(सुनहला)

पैशासंबंधी अर्थातच आर्थिकदृष्ट्या कोणती समस्या असेल तर त्यासाठी सिट्रिन अर्थातच सुनहला हे रत्न अतिशय फायदेशीर ठरते. पिवळसर रंगाचे मऊ आणि पारदर्शी असे हे रत्न असते. हे रत्न धारण केल्यास आर्थिक स्थिती सुधारते. विविध मार्गाने धनप्राप्ती होते.

पायराइट स्टोन

वजनाने अतिशय हलका, मऊ थोडासा दबाव देताच भुगा होणार हा धातू असतो. या धातूला रत्न शास्त्रात अतिशय महत्व आहे. या धातूपासून बनवलेले आभूषण धारण केल्यास तुमचे नशीब उघडते. हे रत्न प्रामुख्याने पैशाला आकर्षित करते अशी मान्यता आहे. त्यामुळे हे रत्न आपल्याजवळ असल्यास आपल्याला पैशांची कमतरता भासत नाही.

ग्रीन जेड

तुमची आर्थिक स्थिती बिकट असेल आणि तुम्ही अडचणीत असाल तर हे रत्न तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरु शकते. मान्यतेनुसार हे रत्न धारण केल्यास तुमचे नशीब चमकते. तुमच्या आयुष्यात धनवर्षाव होतो. रखडलेली आर्थिक कामे मार्गी लागून आर्थिक स्थिती सुधारते. त्यामुळे अनेक लोकांच्या हातात आपल्याला हे रत्न दिसून येते.

गारनेट

रत्न शास्त्रात इतर तीन धातूंप्रमाणेच हा धातूसुद्धा अतिशय शुभ समजला जातो. हे रत्न धारण केल्याने तुमच्या आयुष्यात असलेल्या आर्थिक टंचाई गायब होतात. कमाईचे नवे मार्ग खुले होतात. त्यामुळे आयुष्यात आर्थिक स्थिरता येते. करिअरमध्ये अडलेली कामे पूर्णत्वास जाऊन प्रगती होण्यास मदत होते. त्यामुळे जोतिष हे रत्न धारण करण्याचा सल्ला देतात.

WhatsApp channel
विभाग