मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Ratna Jyotish : शुक्र ग्रहाचे हे रत्न तुम्हालाही क्षणार्धात करेल मालामाल! धारण करण्यापूर्वी वाचा नियम

Ratna Jyotish : शुक्र ग्रहाचे हे रत्न तुम्हालाही क्षणार्धात करेल मालामाल! धारण करण्यापूर्वी वाचा नियम

Jun 24, 2024 05:33 PM IST

Gemstone of Planet Venus : ज्योतिषांच्या सल्यानुसार त्या-त्या दोषांवर आवश्यक ते रत्न परिधान केल्यास आयुष्यातील अडचणी दूर होऊन सुखाचे दिवस येतात. आपण शुक्र ग्रहाला प्रिय असणाऱ्या रत्नाबाबत जाणून घेणार आहोत. पाहूया ते रत्न नेमके कोणते आहे आणि त्याचे फायदे काय आहेत?

शुक्र ग्रहाचे रत्न, रत्न ज्योतिष
शुक्र ग्रहाचे रत्न, रत्न ज्योतिष

ज्योतिषशास्त्र ज्याप्रमाणे आपल्याला त्या व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाबद्दल माहिती प्रदान करते, त्याचप्रमाणे रत्नशास्त्र त्या राशीचे अशक्त किंवा अशुभ ग्रह कोणते आहेत आणि त्यावर कोणते रत्न घातल्यास त्या व्यक्तीचे नशीब पालटू शकते याची माहिती देते. ज्योतिषांच्या सल्यानुसार त्या-त्या दोषांवर आवश्यक ते रत्न परिधान केल्यास त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर होऊन सुखाचे दिवस येतात. आज आपण शुक्र ग्रहाला प्रिय असणाऱ्या रत्नाबाबत जाणून घेणार आहोत. पाहूया ते रत्न नेमके कोणते आहे आणि त्याचे फायदे काय आहेत?

शुक्र ग्रहासाठी हे रत्न प्रिय

ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहासाठी कोणते ना कोणते रत्न महत्वाचे आहे. रत्नशास्त्रात सुखसमृद्धी, सौंदर्य, प्रेम आणि धन यांचा कारक असणाऱ्या शुक्र ग्रहाला हिरा हे रत्न अत्यंत प्रिय आहे. हिरा हा अतिशय महागडा रत्न आहे. योग्य नियमानुसार हिरा धारण केल्याने कुंडलीत शुक्र ग्रहाची स्थिती मजबूत होते. हिरा धारण केल्याने नेमके काय लाभ मिळतात? आणि तो कोणत्या पद्धतीने आणि कुणी धारण करावा याबाबत आपण पाहूया.

हिरा कधी आणि कसा धारण करावा?

रत्नशास्त्रात प्रत्येक रत्नाचे एक वेगळे महत्व आणि वेगळे गुणधर्म आहे. त्यामुळेच हे रत्न योग्य पद्धतीने धारण करणे आवश्यक असते. योग्य नियमानुसार हे रत्न धारण न केल्यास त्याचा फायदा त्या लोकांना मिळत नाही. हिरा धारण करण्याचीदेखील एक विशिष्ट्य पद्धत आहे. शुक्राशी संबंधित असल्याने हिरा शुक्रवारच्या दिवशी धारण करणे अत्यंत शुभ असते. याशिवाय हिरा हातात घालण्यापूर्वी दूध, मध, गंगाजल अशा पवित्र द्रव्यांमध्ये त्याचे शुद्धीकरण अवश्य करावे. असे केल्यास त्याचा फायदा तुम्हाला मिळतो. शुद्धीकरण केल्यानंतर हीरा देवी लक्ष्मीच्या चरणात अर्पण करावा. आणि त्यांनतर तो हातात घालावा.

परंतु ज्यांच्या राशीत मंगळ, गुरु आणि शुक्र एकत्र विराजमान आहेत अशा लोकांनी हिरा धारण करणे टाळावे. अथवा त्याचे नकारात्मक परिणाम भोगावे लागतात. रत्न शास्त्रानुसार मूंगा किंवा माणिकसोबत हिरा धारण करु नये. चांगल्या लाभासाठी हिरा चांदी किंवा सोन्याच्या धातूमध्येच घडवून धारण करावा. तसेच हिरा धारण करण्यापूर्वी एकदा ग्रहांची स्थिती जाणून घेणे आवश्यक असते. त्यासाठी ज्योतिषांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.

हिरा काही राशींसाठी अत्यंत फायदेशीर तर काही राशींसाठी नुकसानीचा ठरु शकतो. त्यामुळे ज्योतिषांच्या सल्य्याने योग्य त्या व्यक्तीनेच हिरा धारण करावा. शास्त्रानुसार मकर, मिथुन, कुंभ, कन्या, वृषभ, तूळ राशीच्या लोकांनीच हिरा धारण करणे फायदेशीर ठरते.

WhatsApp channel
विभाग