Gemstones: ज्योतिषशास्त्रात रत्नांना खूप महत्त्व आहे. रत्न धारण केल्याने व्यक्तीच्या जीवनावर थेट परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रानुसार रत्न धारण केल्याने व्यक्तीला भाग्य प्राप्त होते. ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात मन लागत नाही, त्यांच्यासाठी सुनैला रत्न हे अत्यंत भाग्यवान रत्न आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरूचा वाईट प्रभाव आणि कमकुवतपणा यामुळे व्यक्तीला अभ्यासात मन लागत नाही. गुरूला बळकट करण्यासाठी खास रत्न धारण करण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्र देतो. करिअर आणि शिक्षणात यश मिळवण्यासाठी ज्योतिषी सुनैला रत्न धारण करण्याचा सल्ला देतात. हे रत्न सोनेरी हिरव्या रंगाचे असते. तो अगदी पुखराजसारखा दिसतो. हे पुखराज रत्नाचे उपरत्न आहे. हे रत्न गुरुवारी परिधान करावे. ते अष्टधातूमध्ये ठेवून उजव्या हाताच्या तर्जनीबोटात घालावे. धनु आणि मीन राशीच्या लोकांसाठी हे रत्न अत्यंत भाग्यवान सिद्ध होते. सुनैला रत्नाचे इतरही अनेक फायदे आहेत. चला जाणून घेऊया, या रत्नाचे इतर फायदे.
सुनैला रत्न धारण करणे विद्यार्थ्यांसाठी अतिशय फायदेशीर समजले जाते. ज्योतिषशास्त्रात याला विशेष असे महत्त्वा आहे. सुनैला रत्न धारण केल्याने व्यवसाय आणि करिअरमध्ये यश मिळू लागते. ज्या व्यक्ती व्यवसायात आहेत अशा व्यक्तींसाठी सुनैला रत्न परिधान करणे शुभ ठरू शकते.
सुनैला रत्न धारण केल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशाची शक्यता वाढते. नोकरीत पदोन्नती मिळण्यास मदत होते. सुनैला रत्न धारण केल्याने नवीन व्यवसाय सुरू होण्यास मदत होते.
अभ्यासात कमकुवत असलेल्या मुलांसाठी सुनैला रत्न धारण करणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते. केवळ विद्यार्थ्यांसाठीच या रत्नाचा उपयोग आहे असे नाही, तर या रत्नाचा व्यक्तीच्या आर्थिक स्थितीशी देखील संबंध लावला गेला आहे. त्यानुसार, सुनैला रत्न धारण केल्याने आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते.
हे रत्न धारण केल्याने विविध प्रकारचे फायदे होत असतात.
बुद्धीच्या विकासासाठी सुनैला रत्न उपयुक्त ठरते. हे रत्न धारण केल्याने निर्णय क्षमता विकसित होते.
सुनैला रत्न धारण केल्याने त्याचा व्यक्तीच्या मानसिक स्थितीवर देखील परिणाम होत असल्याचे मानले जाते. या रत्नामुळे धारण करणाऱ्या व्यक्तीचा मानसिक ताण कमी होतो.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.