Gemstone : प्रेम जीवनात आनंद आणि अधिक गोडवा आणण्यासाठी करा यापैकी कोणतेही १ रत्न परिधान
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Gemstone : प्रेम जीवनात आनंद आणि अधिक गोडवा आणण्यासाठी करा यापैकी कोणतेही १ रत्न परिधान

Gemstone : प्रेम जीवनात आनंद आणि अधिक गोडवा आणण्यासाठी करा यापैकी कोणतेही १ रत्न परिधान

Dec 02, 2024 10:53 PM IST

Gemstone For Love Life In Marathi : ज्योतिषशास्त्रात प्रेम जीवनातील समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आणि वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी काही रत्ने धारण करणे फायदेशीर मानले जाते. जाणून घ्या ही रत्ने कोणती.

रत्न ज्योतिष
रत्न ज्योतिष

Gemstone For Love Life In Marathi : रत्नांमध्ये जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी काही रत्ने परिधान करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते. रत्न ज्योतिषशास्त्रात वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी काही रत्ने धारण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. असे मानले जाते की हे रत्न धारण केल्याने प्रेम जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. प्रेमप्रकरणांमध्ये गोडवा येतो आणि दांपत्य जीवन आनंदी राहते. चला तर मग जाणून घेऊया वैवाहिक जीवनातील त्रास कमी करण्यासाठी कोणते रत्न धारण करावे?

रोज क्वार्ट्ज - रोज क्वार्ट्ज रत्न गुलाबी रंगाचा असतो. हा दगड प्रेम आणि नात्याशी संबंधित मानला जातो. म्हणूनच याला लव्ह स्टोन असेही म्हणतात. हा दगड परिधान केल्याने नात्यांमध्ये प्रेम आणि रोमान्स वाढतो. आपण क्वार्ट्जचा एक तुकडा आपल्याजवळ ठेवू शकता किंवा दररोज दागिना घालू शकता. असे मानले जाते की यामुळे लव्ह लाईफ चांगली होते.

अमेथिस्ट - वैवाहिक जीवनातील भावनिक समस्या दूर करण्यासाठी अमेथिस्ट रत्न उपयुक्त मानला जातो. असे मानले जाते की हे रत्न परिधान केल्याने नात्यांमध्ये स्पष्टता येते. प्रेम जीवनामध्ये सुख आणि आनंद असतो. हे तणाव आणि चिंता कमी करण्यास देखील उपयुक्त आहे. यामुळे नात्यात संवाद आणि समजूतदारपणा वाढतो.

गार्नेट - गार्नेट रत्न गडद लाल रंगाचा असतो. त्यातून उत्कटता, बांधिलकी आणि आत्मविश्वास दिसून येतो. नात्यांमध्ये प्रेम जागृत करण्यासाठी आणि प्रेमजीवन रोमांचक करण्यासाठी हे रत्न फायदेशीर ठरते, असे मानले जाते. असं म्हटलं जातं की, हे रत्न नात्यांमध्ये आपल्या खऱ्या भावना व्यक्त करण्याचं धाडस देते. हे आपले आणि आपल्या जोडीदाराचे नाते देखील मजबूत करते.

सिट्रिन- सिट्रिन रत्न पिवळ्या रंगाचा असतो. हे रत्न सकारात्मकता आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की हे रत्न धारण केल्याने प्रेम जीवनात ऊर्जा आणि उत्साह टिकून राहतो. हे रत्न सुख-समृद्धी आकर्षित करते. यामुळे आत्मविश्वासही वाढू शकतो.

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner