Gemstone Astrology: रत्नशास्त्रानुसार काही विशेष रत्नांच्या आधारे नोकरी-व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर केल्या जाऊ शकतात. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थितीदेखील मजबूत होते. अनेक लोकांना प्रचंड कष्ट करुनसुद्धा कामात यश मिळत नाही. उद्योगधंद्यात नुकसान सहन करावा लागतो. काही लोकांना नोकरीमध्ये रात्रंदिवस मेहनत करुनही प्रगती होत नाही. याउलट कामात सतत अडचणी सहन कराव्या लागतात. अशावेळी दुसरा पर्याय म्हणून रत्नशास्त्राचा आधार घेतला जाऊ शकतो. रत्न शास्त्रामध्ये या अडचणींवर एक रत्न धारण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या रत्नाच्या वापराने आर्थिक अडचणी दूर होतात आणि बक्कळ पैसा उपलब्ध होतो.
रत्नशास्त्रानुसार या स्थितीमध्ये जरकन हे रत्न अत्यंत लाभदायक ठरते. मोत्यासारखे एक पांढऱ्या रंगाचे हे रत्न असते. हे रत्न धारण केल्याने त्या व्यक्तीच्या आयुष्यात सुखसमृद्धी, ऐश्वर्य, धन आणि संपत्तीचा वर्षाव होतो. विशेष म्हणजे हे रत्न हिऱ्याच्या तुलनेत कमी महाग असते. त्यामुळे बहुतांश लोकांना खरेदी करणे शक्य होते. जरकन रत्न धारण केल्यास आयुष्यात कामाप्रती एक वेगळाच उत्साह आणि जिद्द दिसून येते. त्यामुळे ज्योतिष अनेक लोकांना हे रत्न धारण करण्याचा सल्ला देतात. आणि ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार हे रत्न धारण करणे जास्त सोयीस्कर ठरते.
ज्योतिष अभ्यासानुसार जरकन हे पांढऱ्या रंगाचे रत्न धारण करण्यासाठी शुक्रवारचा दिवस अत्यंत शुभ असतो. या रत्नाला खासकरुन चांदीच्या अंगठीमध्ये घडवून घालावे. त्यामुळे विशेष फायदा मिळतो. तसेच अंगठी हातात घालण्यापूर्वी एका वाटीत दूध आणि गंगाजल घेऊन त्यामध्ये ही अंगठी ठेवून द्यावी. त्यानंतर पूजापाठ करुन अंगठी धारण करावी. महत्वाची गोष्ट म्हणजे अंगठी धारण करण्यापूर्वी १०८ वेळा ''ॐ द्रां द्रीं द्रौं स: शुक्राय नम:।'' या शुक्र मंत्राचा जप करावा. या योग्य पद्धतीने अंगठी धारण केल्यास रत्नाचा पूर्ण लाभ तुम्हाला मिळतो.
ज्योतिषशास्त्रानुसार प्रामुख्याने एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमधील शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी हे रत्न धारण केले जाते. शुक्राला सुख, वैभव, धनसंपत्ती, ज्ञान यांचे प्रतीक समजले जाते. त्यामुळे शुक्र मजबूत असेल तर त्या लोकांना या गुणांचा फायदा मिळतो. जोतिषीय सल्ल्यानुसार तूळ आणि कर्क राशीच्या लोकांसाठी हे रत्न धारण करणे अत्यंत लाभदायक ठरु शकते. तसेच एखाद्या व्यक्तीच्या विवाह ठरण्यात अडचण येत असेल. तर हे रत्न फायदेशीर ठरु शकते. सिंह, कन्या आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी मात्र शुक्र ग्रहाची स्थिती पाहून आणि ज्योतिषांचा सल्ला घेऊनच हे रत्न धारण करावे.
संबंधित बातम्या