Garud Puran: या ७ गोष्टी पाहिल्यास लाभते पुण्य, मिळते शुभ फळ, गरुड पुराणात आढळते वर्णन
मराठी बातम्या  /  धर्म  /  Garud Puran: या ७ गोष्टी पाहिल्यास लाभते पुण्य, मिळते शुभ फळ, गरुड पुराणात आढळते वर्णन

Garud Puran: या ७ गोष्टी पाहिल्यास लाभते पुण्य, मिळते शुभ फळ, गरुड पुराणात आढळते वर्णन

Updated Feb 14, 2025 02:17 PM IST

Garud Puran: गरुड पुराण हिंदू धर्मातील १८ पुराणांपैकी एक मानले जाते. गरुड पुराणात भगवान विष्णू आणि गरुड पक्षी यांच्यातील संवादाचे वर्णन आहे. गरुड पुराणातील एका श्लोकात सांगितले आहे की, कोणत्या गोष्टी आहेत...

या ७ गोष्टी पाहिल्यास लाभते पुण्य, मिळते शुभ फळ, गरुड पुराणात आढळते वर्णन
या ७ गोष्टी पाहिल्यास लाभते पुण्य, मिळते शुभ फळ, गरुड पुराणात आढळते वर्णन

Garud Puran: गरुड पुराण हिंदू धर्मातील १८ पुराणांपैकी एक मानले जाते. गरुड पुराणात भगवान विष्णू आणि गरुड पक्षी यांच्यातील संवादाचे वर्णन आहे. मनुष्याने कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या करू नयेत, तसेच कोणते कार्य केल्याने पुण्य प्राप्त होते, कोणत्या कार्यामुळे पाप होते, तसेच मृत्यूनंतर काय होते अशा गोष्टींचे मार्गदर्शन गरुड पुराण या महापुराणात करण्यात आलेले आहे. गरुड पुराणातील एका श्लोकात सांगितले आहे की, कोणत्या गोष्टी नुसत्या पाहिल्यावर मनुष्याला पुण्य प्राप्त होते. त्या गोष्टींबद्दल जाणून घ्या-

श्लोक आहे -

गोमूत्रं गोमयं दुन्धं गोधूलिं गोष्ठगोष्पदम्।

पक्कसस्यान्वितं क्षेत्रं द्ष्टा पुण्यं लभेद् ध्रुवम्।।

म्हणजे गोमूत्र, शेणखत, गायीचे दूध, गोधूळ, गोशाळा, शेण आणि पिकलेली शेती पाहून पुण्य प्राप्त होते.

गोमूत्र

शास्त्रानुसार गोमूत्रात गंगा मातेचा वास असतो. याचा उपयोग औषध म्हणूनही केला जातो. परंतु ते पाहून मनुष्याला पुण्यप्राप्ती होते, असे गरुड पुराणात वर्णन आहे.

शेण

गायीचे शेण शुभ मानले जाते. याचा उपयोग पूजा आणि शुभकार्यात केला जातो. गरुड पुराणानुसार गायीचे शेण पाहिल्यास शुभ फळ मिळते.

गायीचे दूध

गायीचे दूध अमृतासारखे मानले जाते. गाईच्या दुधाचे सेवन केल्याने अनेक आजारांपासून मुक्ती मिळू शकते. गरुड पुराणात म्हटले आहे की, गायीचे दूध पाहून मनुष्याला पुण्य प्राप्त होते.

गोधूळ

जेव्हा गायींच्या खुरांनी जमिनीवरची धूळ हवेत विखुरते तेव्हा तिला गोधूळ म्हणतात. गाईच्या पायापासून माती काढणे शुभ मानले जाते. गरुड पुराणानुसार केवळ ते पाहिल्यास पुण्य प्राप्त होते.

गोशाळा

ज्या ठिकाणी गायी राहतात त्या ठिकाणाला गोठा म्हणतात. मंदिराप्रमाणेच गोशाळाही पूजनीय मानली जाते. गोसेवेतून माणसाला पुण्य प्राप्त होते. परंतु गोशाळेचे नुसते दर्शन केले तरी पुण्य प्राप्त होते, असा उल्लेख गरुड पुराणात आहे.

गोखुर

गायीचे पाय तीर्थासारखे मानले जातात. असे मानले जाते की एखाद्या कामासाठी जाताना गायीच्या पायाला स्पर्श केल्यास त्या कार्यात यश मिळते.

शेती

शेतात धान्य निर्मितीसाठी शेतकरी अहोरात्र मेहनत घेतात. शेतात पिकलेली शेती मनाला शांती देते. गरुड पुराणानुसार माणसाला केवळ पिकलेल्या शेतीच्या दर्शनाने पुण्य प्राप्त होते.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि धर्मनिरपेक्ष श्रद्धा ंवर आधारित आहे, जी केवळ सामान्य लोकहितासाठी सादर करण्यात आली आहे.

Sunil Madhukar Tambe

eMail

Whats_app_banner