Garud Puran: हिंदू धर्मात गरुड पुराणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गरुड पुराणात भगवान विष्णू आणि गरुडपक्षी यांच्यात संवाद आहे. गरुड पुराणात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यांचे पालन करून माणूस अनेक प्रकारच्या समस्यांपासून स्वत:ला वाचवू शकतो. गरुड पुराणात सांगितले आहे की, घरात सुख-शांती ठेवायची असेल तर कोणापासून अंतर ठेवावे?
सध्या खरा मित्र मिळणे कठीण आहे. पण जेव्हा तुम्हाला खरा मित्र मिळतो तेव्हा नशीब खुलतं. मित्र हे आयुष्यातील सर्वात मैत्रीपूर्ण मानले जातात. दु:खात आणि आनंदात सच्चा मित्र तुमच्यासोबत असतो. जर दुष्ट व्यक्ती मित्र बनली तर तो तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. असा मित्र आपल्याला चुकीच्या मार्गावर घेऊन जातो किंवा शारीरिक हानी पोहोचवतो. त्यामुळे अशा मित्रांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.
सध्याच्या काळात लोक घरामध्ये नोकर ठेवतात. नोकर ठेवल्याने तुम्हाला अनेक कामांमध्ये मदत होते. त्याचबरोबर आपल्या अनेक वैयक्तिक गोष्टीही त्याला माहित असतात. पण नोकराशी वाद झाला तर त्याच्यापासून सावध राहिले पाहिजे. ज्या व्यक्तीला तुमच्या वैयक्तिक गोष्टी माहित आहेत ती व्यक्ती केव्हाही तुमचं नुकसान करू शकते.
गरुड पुराणानुसार सापाबाबत देखील माहिती देण्यात आलेली आहे. गरुड पुराणानुसार घरात जर साप आला तर त्याला ताबडतोब घालवून द्यावे. असे म्हटले जाते की, एखादा सापावर जर चुकून पाय पडला तर तो चावल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे सापाला घराबाहेर काढून ज्या ठिकाणी त्याने राहिले पाहिजे, अशा ठिकाणी ठिकाणी सोडून द्यावे, असे गरुड पुराणात सांगण्यात आले आहे.
गरुड पुराण हे वैष्णव संप्रदायाशी संबंधित एक महान पुराण आहे. हिंदू धर्मातील एकूण १८ पुराणांपैकी ते एक आहे. सनातन धर्मात ते मृत्युनंतर मोक्ष प्रदान करणारे मानले जाते. म्हणूनच सनातन हिंदू धर्मात मृत्यूनंतर गरुड पुराण ऐकण्याची तरतूद आहे.
Disclaimer: या लेखातील माहिती धार्मिक श्रद्धा आणि धर्मनिरपेक्ष श्रद्धांवर आधारित आहे, जी केवळ सामान्य लोकहितासाठी सादर केली गेली आहे. अंधश्रद्धा पसरवणे हा या माहितीचा उद्देश नाही.
संबंधित बातम्या