Ganesh Chaturthi 2024: वर्षभराने आता गणपती बाप्पा पुन्हा एकदा आपल्या घरी येण्यासाठी सज्ज झाले आहेत. गणेश चतुर्थी या सणाला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार भगवान गणेशाचा जन्म भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला झाला होता. त्यामुळे दरवर्षी या तिथीला गणेश चतुर्थीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गणेश चतुर्थी हा सण १० दिवस जल्लोषात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक आपल्या घरी गणपती बाप्पाची मूर्ती आणतात आणि १० दिवसांनंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचे विसर्जन करून त्यांना निरोप देतात.
वैदिक कॅलेंडरनुसार, ७ सप्टेंबर २०२४ रोजी गणपती बाप्पाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी ११.०३ ते दुपारी ०१.३३ पर्यंत आहे. असे मानले जाते की, या १० दिवसांमध्ये जर एखाद्या व्यक्तीने खऱ्या मनाने आपल्या आवडत्या वस्तू देवाला अर्पण केल्या, तर त्याच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. चला जाणून घेऊया राशीनुसार गणपती बाप्पाला कोणत्या मिठाई अर्पण करणे शुभ आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांनी सलग १० दिवस गणेशाला बुंदीचे लाडू अर्पण केले, तर त्यांना त्यांच्या सर्व त्रासांपासून कायमची मुक्ती मिळू शकते.
वृषभ राशीच्या लोकांनी गणपतीला माव्यापासून बनवलेले मोदक अर्पण केल्यास, त्यांना देवाचा विशेष आशीर्वाद मिळतो.
मिथुन राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी देवाला मूगाचे लाडू अर्पण केल्यास, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात.
कर्क राशीच्या लोकांसाठी श्रीगणेशाला खव्याचे लाडू अर्पण करणे शुभ मानले जाते.
गणपतीला गुळ खूप आवडतो. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी देवाला गूळ अर्पण केल्यास त्यांना बाप्पाचा विशेष आशीर्वाद मिळू शकतो.
श्रीगणेशाचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी कन्या राशीच्या लोकांनी मुगाच्या डाळीचा हलवा देवाला अर्पण करावा.
तूळ राशीच्या लोकांनी श्रीगणेशाला नारळ अर्पण केल्यास त्यांच्या जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग उघडू शकतात.
वृश्चिक या राशीच्या लोकांनी गणपती बाप्पाला बुंदीचे लाडू गणेशाला अर्पण करणे शुभ मानले जाते.
जर तुम्हाला श्रीगणेशाचा विशेष आशीर्वाद मिळवायचा असेल तर, त्यासाठी तुम्ही त्यांना पिवळी मिठाई अर्पण करू शकता.
गणेशजींना मोतीचूर लाडू खूप आवडतात. त्यामुळे मकर राशीच्या लोकांनी ते देवाला अर्पण केल्यास त्यांचा विशेष आशीर्वाद मिळतो.
या राशीच्या लोकांनी गणपतीला सुका मेवा अर्पण करणे शुभ मानले जाते.
मोदकाशिवाय मोतीचूर लाडू देखील गणपतीचा आवडता नैवेद्य मानला जातो. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या विशेष प्रसंगी देवाला मोतीचूर लाडू अर्पण केल्यास करिअरमध्ये येणारे सर्व अडथळे हळूहळू दूर होऊ शकतात.