गणेश चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व आहे. यंदा गणेश चतुर्थी ७ सप्टेंबरला आहे. हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरा केला जातो. गणेश चतुर्थीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. अशात सर्वांना बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता असते आणि १० दिवस बाप्पाच्या येण्याने वातावरणात आनंद पसरतो. या शुभ प्रसंगी श्रीगणेशाची भक्तिभावाने पूजा केली जाते.
श्रीगणेशाची आराधना केल्याने सुख आणि सौभाग्याची अपार वृद्धी होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. तसेच सर्व वाईट गोष्टी नष्ट होतात. तुम्हालाही गणपतीच्या आशीर्वादाचे भागीदार व्हायचे असेल तर गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची विधीपूर्वक पूजा करा. तसेच संपूर्ण गणेशोत्सवात पूजा करताना राशीनुसार या मंत्रांचा जप करावा.
पंचांगानुसार भाद्रपद महिन्याची चतुर्थी तिथी ६ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजून १ मिनिटांनी सुरू होईल. तर ७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजून ३७ मिनिटांनी चतुर्थी तिथी समाप्त होईल. अशा स्थितीत उदया तिथीनुसार शनिवार, ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीचा सण साजरा होणार आहे.
मेष जातकाने गणेश चतुर्थीला 'ॐ गजाननाय नमः' मंत्राचा जप करावा.
वृषभ राशीच्या जातकांनी गणेशाची कृपा प्राप्त करण्यासाठी 'ॐ द्विमुखाय नमः' या मंत्राचा जप करावा.
मिथुन जातकांनी गणेश चतुर्थीला ॐ सुमुखाय नमः या मंत्राचा जप करावा.
कर्क राशीच्या जातकांनी इच्छित गोष्टी प्राप्त करण्यासाठी 'ॐ ब्रह्मरूपिने नमः' या मंत्राचा जप करावा.
सिंह राशीच्या जातकांनी गणेश चतुर्थीला ॐ सुखनिधये नमः या मंत्राचा जप करावा.
श्रीगणेशाची कृपा प्राप्त करण्यासाठी 'ॐ महाकालाय नमः' या मंत्राचा जप करा.
तूळ राशीच्या जातकांनी गणेश चतुर्थीला 'ॐ महाबलाय नमः' या मंत्राचा जप करावा.
वृश्चिक जातकांनी गणेश चतुर्थीला 'ॐ महोदराय नमः' या मंत्राचा जप करावा.
धनु राशीच्या जातकांनी गणेश चतुर्थीला ॐ महावीराय नमः या मंत्राचा जप करावा.
मकर राशीच्या जातकांनी इच्छित वरदान मिळविण्यासाठी 'ॐ अग्रपूज्याय नमः' या मंत्राचा जप करावा.
कुंभ राशीच्या जातकांनी गणेश चतुर्थीला 'ॐ सर्वाय नमः' मंत्राचा जप करावा.
गणपती बाप्पाची कृपा प्राप्त करण्यासाठी मीन राशीच्या जातकाने ‘ॐ प्रधानाय नमः’ या मंत्राच्या पाच माळांचा जप करावा.