Fengshui Tips: फेंगशुईच्या या गोष्टी मानल्या जातात शुभ, त्या घरात विशिष्ट ठिकाणी ठेवल्याने होतात असे लाभ!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Fengshui Tips: फेंगशुईच्या या गोष्टी मानल्या जातात शुभ, त्या घरात विशिष्ट ठिकाणी ठेवल्याने होतात असे लाभ!

Fengshui Tips: फेंगशुईच्या या गोष्टी मानल्या जातात शुभ, त्या घरात विशिष्ट ठिकाणी ठेवल्याने होतात असे लाभ!

Nov 28, 2024 12:02 PM IST

Feng Shui Tips in marathi: ग्रहांच्या अनिष्ट प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनावर वाईट परिणाम होतो. फेंगशुई चे उपाय केल्याने ग्रहाचा अनिष्ट प्रभाव कमी होतो. फेंगशुईच्या उपायांमुळे ग्रहदोष दूर होण्यास तसेच घराच्या सौंदर्यात भर पडण्यास मदत होते.

 फेंगशुईच्या या गोष्टी मानल्या जातात शुभ, त्या घरात विशिष्ट ठिकाणी ठेवल्याने होतात असे लाभ!
फेंगशुईच्या या गोष्टी मानल्या जातात शुभ, त्या घरात विशिष्ट ठिकाणी ठेवल्याने होतात असे लाभ!

Marathi Feng Shui Tips: ग्रहांच्या अनिष्ट प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनावर वाईट परिणाम होतो. फेंगशुईचे उपाय केल्याने ग्रहाचा अनिष्ट प्रभाव कमी होतो. फेंगशुईने सांगितलेल्या या उपायांमुळे ग्रहदोष दूर होण्यास मदत होते. तसेच, या उपायांमुळे घराच्या सौंदर्यात भर पडण्यास मदत होते. असे मानले जाते की घरात फेंगशुई वॉटर फाउंटन (कारंजे) ठेवल्यास धनप्राप्ती होते. चला तर मग जाणून घेऊ या, आपल्या घरात फेंगशुई वॉटर फाउंटन ठेवल्याने काय काय फायदे होतात.

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवा फेंगशुई वॉटर फाउंटन

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर फेंगशुईचा वॉटर फाउंटन ठेवावा. असे मानले जाते की, ज्या घरात मुख्य दरवाजाजवळ वाहत्या पाण्याचा झरा असतो त्या घराला धनप्राप्ती होते. अशा घरात देवी लक्ष्मीची विशेष कृपा असते, अशीही मान्यता आहे.

मुख्य प्रवेशद्वाराच्या कोणत्या बाजूला ठेवावे वॉटर फाउंटन?

मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला फेंगशुईचा वॉटर फाउंटन देखील ठेवू शकता. वाहते पाणी किंवा वाहता झरा असलेले फेंगशुई वॉटर फाउंटन या ठिकाणी ठेवणे शुभ मानले गेले आहे.

फेंगशुईच्या वॉटर फाउंटनचा पाण्याचा भाग घराच्या आत असावा. असे केल्याने आर्थिक लाभ होतो, असे फेंगशुईमध्ये सांगितले गेले आहे.

घरात अग्नेय दिशेलाही ठेऊ शकता वॉटर फाउंटन

फेंगशुईचा वॉटर फाउंटन ही तुम्ही आग्नेय दिशेला ठेवू शकता. या दिशेला फेंगशुईचा वॉटर फाउंटन ठेवल्यास धनप्राप्ती होते.

फेंगशुई वॉटर फाउंटन उत्तर दिशेला ठेवल्याने काय लाभ मिळतो?

फेंगशुईचा वॉटर फाउंटन नेहमी उत्तर दिशेला ठेवावा असे म्हटले गेले आहे. असे केल्याने व्यक्तीची करिअरमध्ये प्रगती होते. या बरोबरच वॉटर फाउंटन उत्तर दिशेला ठेवल्यास ते व्यक्तीच्या किंवा कुटुंबीयांच्या आरोग्यासाठीही चांगले असते.

घरात फेंगशुई वॉटर फाउंटन लावताना या गोष्टी लक्षात ठेवा :

>  घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर कधीही पाण्याचे दोन कारंजे किंवा फेंगशुई वॉटर फाउंटन ठेवू नका ठेवू नका.

> कारंजातून पडणाऱ्या पाण्याचा आवाज बेडरूमपर्यंत पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी.

>  तुम्ही लावलेल्या फेंगशुई वॉटर फाउंटन किंवा कारंजातील वा पाण्याच्या झऱ्यातील पाणी सतत वाहते असावे. ते कधीही थांबलेले नसावे याची काळजी घ्या.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner