Feng Shui Tips In Marathi : सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरू आहे. अशात आपल्या नात्यातील प्रेम सुदृढ राहण्यासाठी जोडीदारासाठी आपण अनेक गोष्टी करत असालच त्यासोबतच काही फेंगशुई टिप्सही फॉलो करू शकतात. कुटुंबातही आपण फेंगशुईनुसार, सुखी आणि समृद्ध जीवनासाठी फेंगशुईच्या काही नियमांची विशेष काळजी घेतली पाहिजे. तसेच काही फेंगशुई टिप्सच्या मदतीने नात्यातील कटुता दूर केली जाऊ शकते. प्रेम जीवनामध्ये सुधारणा होऊ शकते. असे मानले जाते की, फेंगशुईच्या या खास टिप्स घरातील नकारात्मकता दूर करतात आणि प्रेमसंबंध गोड होण्यास मदत करतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनामधून नकारात्मकता दूर करायची असेल, तर तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये फेंगशुईचे हे काही टिप्स फॉलो करून पाहू शकता. आनंदी प्रेम जीवनासाठी फेंगशुईच्या सोप्या टिप्स जाणून घेऊया...
लाल किंवा गुलाबी रंगांचा अधिक वापर : प्रेमसंबंधांमध्ये गोडवा आणण्यासाठी लाल आणि गुलाबी रंगांचा अधिक वापर करा. उदाहरणार्थ, गुलाबी पडदे किंवा लाल मेणबत्त्यांनी बेडरूम सजवा. असे मानले जाते की यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा येते.
बेडरूमची स्वच्छता : नाते घट्ट आणि गोड होण्यासाठी बेडरूम आणि घराच्या इतर खोल्या आणि कोपऱ्यांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. घरात कुठेही कचरा होऊ देऊ नका. हे तुम्हाला जीवनात सकारात्मकता वाढविण्यात देखील मदत करू शकते.
झाड किंवा रोप लावा : जीवनात सकारात्मकता वाढवण्यासाठी घराचे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे घरात हवा शुद्ध करणारी झाडे किंवा रोपे लावा. सुवासिक फुले असलेली झाडे देखील लावता येतात.
योग्य रंगांची निवड : प्रेम जीवनात आनंद आणि शांतता टिकवून ठेवण्यासाठी घराच्या भिंतींचा योग्य रंग निवडा. भिंती रंगवताना मनाला समाधान आणि शांती देणारे रंग निवडा.
मँडरीन डक : प्रेम संबंध मजबूत करण्यासाठी, आपण बेडरूममध्ये मँडरिन डक देखील ठेवू शकता. वैवाहिक समस्यांवर मात करण्यासाठी, आपण बेडरूमच्या दक्षिण-पश्चिम कोपऱ्यात मँडरीन डकची मूर्ती ठेऊ शकता किंवा चित्र लावू शकता. असे मानले जाते की यामुळे नात्यात जवळीक वाढते.
संबंधित बातम्या