Marathi Fengshui Tips: फेंगशुईशास्त्र हे एक प्रकारचे वास्तुशास्त्रच आहे. हे शास्त्र दोन शब्दांनी बनलेले आहे. फेंगशुईशास्त्रात अशा काही गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे ज्यामुळे केवळ सौभाग्यच नाही तर तुमचे घर सौंदर्याने परिपूर्ण देखील होऊ शकते. फेंगशुईशास्त्रात सांगितलेले काही उपाय करून पाहिल्यास तुम्ही सकारात्मक ऊर्जा आणि सौभाग्य आकर्षित करू शकता. चला जाणून घेऊ या, फेंगशुईशास्त्रात सांगितलेल्या काही गोष्टी, ज्यामुळे तुमच्या दिवाणखान्याचे सौंदर्य वाढेल तसेच सौभाग्य देखील टिकून राहील
फेंगशुई शास्त्रानुसार, तुम्ही तुमच्या दिवाणखान्यात ५ गोष्टींचा समावेश करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. त्यानुसार तुमची लिव्हिंग रूम अर्थात दिवाणखाना सौंदर्यपूर्ण ठेवण्यासाठी तुम्ही पीस लिली लावावी. पीस लिली ही एक इनडोअर वनस्पती आहे. ही वनस्पती घरात ठेवल्याने सुख आणि समृद्धी टिकून राहते. त्याच प्रमाणे या वनस्पतीच्या अस्तित्वामुळे तुमच्या प्रगतीचा मार्गही मोकळा होतो.
जर तुमची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या कमकुवत असेल तर तुमच्या घरी फिश टँक आणा. घरात फिश टँक ठेवल्यास लिव्हिंग रूमचे सौंदर्य तर वाढेलच, परंतु तुमचे आणि तुमच्या घराचे सौभाग्यही टिकून राहील.
बांबूचे झाड घरासाठी खूप भाग्यवान मानले जाते. हे आरोग्याशी संबंधित असल्याचे मानले गेले आहे. दिवाणखान्यात पूर्व दिशेला बांबूचे झाड लावल्यास कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. आपल्या दिवाणखान्यात बांबूचे झाड लावल्याने कुटुंब सुखी आणि समृद्ध राहते. या बरोबरच बांबूच्या झाडांनी तुमच्या दिवाणखान्याला सौंदर्यपूर्ण रूपही मिळू शकते.
आपल्या दिवाणखान्याला सौंदर्यपूर्ण लूक देण्यासाठी लाफिंग बुद्धाची स्थापना करावी. आपल्या दिवाणखान्यात ठेवावयाची लाफिंग बुद्धाची मूर्ती ही दोन्ही हात वर केलेली असावी. अशा मूर्तीमुळे व्यक्तीला आणि कुटुंबाला सौभाग्य लाभते. लाफिंग बुद्धाच्या अस्तित्वामुळे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या प्रगतीचा मार्गही मोकळा होतो, अशी फेंगशुईशास्त्रात मान्यता आहे.
फेंगशुई हे चीन देशातील वास्तूशास्त्र आहे
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.