Marathi Feng Shui Upay Remedies: फेंगशुई ही चिनी कला आहे. घरात सुख-समृद्धी आणि शांतता राखण्यासाठी फेंगशुई उपायांचा अवलंब केला जातो. फेंगशुईचे उपाय केल्याने आर्थिक लाभ होतो. फेंगशुईची भेट देखील घराच्या सौंदर्यात भर घालण्यास उपयुक्त ठरते. चला जाणून घेऊया, आर्थिक फायद्यासाठी फेंगशुईचे उपाय...
फेंगशुईनुसार घरात रोपे लावल्याने आयुष्याला नवी आणि चांगली सुरुवात होण्यास मदत होते. असे केल्याने आर्थिक समस्यांपासूनही सुटका मिळते.
ग्रहांच्या अनिष्ट प्रभावामुळे व्यक्तीच्या आयुष्यावर वाईट परिणाम होतो. फेंगशुईचे उपाय केल्याने ग्रहाचा अनिष्ट प्रभाव कमी होतो. फेंगशुईच्या उपायांनी ग्रहदोष दूर होण्यास तसेच घराच्या सौंदर्यात भर पडण्यास मदत होते. असे मानले जाते की घरात फेंगशुईचे पाण्याचे कारंजे ठेवल्यास धनप्राप्ती होते. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर फेंगशुईचे पाण्याचे कारंजे ठेवावे. असे मानले जाते की ज्या घरात मुख्य दरवाजाजवळ वाहत्या पाण्याचा झरा असतो त्या घरात धनप्राप्ती होते. अशा घरात देवी लक्ष्मीची विशेष कृपा असते.
फेंगशुईनुसार घरात मनी फ्रॉग ठेवा. मनी फ्रॉग ठेवल्याने सुख-समृद्धी येते. मनी फ्रॉग जमिनीवर कधीही ठेवू नका आणि नियमित पणे साफ करत राहा. यामुळे घरातील आर्थिक प्रवाह टिकून राहतो.
ही फोटो गॅलरी पाहा- हे ५ सोपे वास्तू उपाय तुमच्या मुलाच्या करिअरच्या प्रगतीत करतील मोठी मदत
फेंग या शब्दाचा अर्थ वारा आणि शुई या शब्दाचा अर्थ पाणी असा होतो. म्हणून फेंगशुई या शब्दाचा अर्थ वारा आणि पाण्याचा मार्ग असा होतो. चनी घरे बांधताना तसेच गावे वसवताना फेंगशुईचा वापर केला जातो. फेंगशुईनुसार घरात लाकूड, पाणी, पृथ्वी, अग्नी, आणि धातू या पाच घटकांपैकी एक हलवले तर सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह बदलतो. हे घटक एकमेकांमध्ये मिसळले किंवा काढून टाकले तर तत्काळ सकारात्मकता वाढते असे फेंगशुईचे तज्ज्ञ सांगतात.
फेंगशुई ही एक चिनी कला किवा परंपरा आहे. फेंगशुईचा वापर केल्यानंतर घरात सकारात्मक वातावरण तयार होते अशी मान्यता आहे. फेंगशुईमुळे व्यक्तीच्या जीवनात समृद्धी, भाग्य, विपुलता, सुख, आनंद येतात. फेंगशुईमध्ये विविध रंगांचा वापर केला जातो. तसेच फर्निचरची व्यवस्था कशी असावी, इमारतीची संरचना कशी असावी याचे मार्गदर्शन केले जाते.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या