Feng Shui Upay: घरात शांतता नसेल तर मनही अशांत होते. घरातील कलहामुळे करिअर आणि आर्थिक क्षेत्रावरही परिणाम होत आहे. फेंगशुई हे चिनी वास्तुशास्त्र आहे, ज्यामध्ये असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, जे घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्यास मदत करतात. अनेकदा घरातील वास्तुदोषांमुळे घरातील शांतताही हिरावून घेतली जाते. फेंगशुई उपायांमुळे घरात असलेली शांती राखण्यास मदत होते. फेंगशुईने सांगितलेले काही सोपे उपाय केल्यास घरातील शांती किंवा शांतता नष्ट होत नाही. चला तर मग, जाणून घेऊ या, घरात शांतता राखण्यासाठी काही टिप्स.
बाथरूम आणि किचन घरात समोरासमोर बनवू नये. जर स्वयंपाकघर आणि बाथरूम आधीपासूनच एकमेकांच्या समोर बांधलेले असेल तो वास्तुदोष असल्याचे समजले गेले आहे. असे असेल तर वास्तुदोषांचा प्रभाव कमी करण्यासाठी आपण फेंगशुईचा क्रिस्टल बॉल टांगू शकता.
वास्तुशास्त्रानुसार मंदिराभोवती कधीही घर बांधता कामा नये. मंदिराशेजारी किंवा मंदिराभोवती घर बांधल्यास घरातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो असे वास्तुशास्त्रात म्हटले गेले आहे.
घरात फिशटँग ठेवणे शुभ मानले गेले आहे. घराची शांतता राखण्यासाठी तुम्ही घरात फिशटँक ठेवू शकता. घरात फिशटँक ठेवल्यास घरात असलेला कंगालपणा दूर होऊ शकतो. घरात फिशटँक ठेवल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते, असे मानले जाते.
काही वनस्पती घरासाठी खूप भाग्यवान मानल्या गेल्या आहेत. पूर्व दिशेला बांबूचे झाड किंवा मनी प्लांट लावल्यास कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहते अशी मान्यता आहे. घरात बांबूची रोपटी लावल्याने कुटुंबात सुख-शांती राहते.
घरात शांतता राखण्यासाठी आणि वास्तुदोष कमी करण्यासाठी विंड चाइम लावा. घराच्या दारात आणि जिथून हवा तुमच्या घरात प्रवेश करते त्या ठिकाणी विंड चाइम्स ठेवा.
फेंगशुई ही चीनमधील एक प्राचीन वास्तुकला सिद्धांत आहे. फेंगशुईने सांगितलेल्या उपायांद्वारे घरे, कार्यालये आणि इमारतींची सजावट आणि मांडणी व्यवस्थित करून त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आणली जाते. फेंगशुईनुसार, प्रत्येक गोष्टीत ऊर्जा असते आणि ही ऊर्जा सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकते.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या