Feng Shui Tips: घराच्या सभोवतालचे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक ठेवण्यासाठी रोपांची लागवड अत्यंत फायदेशीर मानली जाते. फेंगशुईनुसार काही झाडे लावल्याने घराची सकारात्मकता वाढते आणि जीवनात धन, सुख आणि समृद्धी येते. यापैकी एक वनस्पती म्हणजे क्रासुला. ही वनस्पती जेड प्लांट, लकी प्लांट आणि मनी प्लांट म्हणून देखील ओळखले जाते. मान्यतेनुसार, ही वनस्पती नकारात्मकता दूर करते आणि घरात आशीर्वाद देखील आणते. उत्पन्नात वाढ होते. घरात हे रोप लावल्याने तणाव दूर होतो आणि मानसिक शांतीही मिळते, असं म्हटलं जातं. नात्यात गोडवा असतो आणि कौटुंबिक जीवनात सुख-शांती असते, पण फेंगशुईमध्ये क्रासुला वनस्पती लावण्याचे काही नियम आहेत. चला तर मग जाणून घेऊ या, घरच्या घरी क्रासुला वनस्पती लावण्यासाठी फेंगशुईचे नियम.
फेंगशुईनुसार क्रासुला वनस्पती पूर्व किंवा आग्नेय दिशेला ठेवणे फायदेशीर मानले जाते. पूर्व किंवा आग्नेय दिशेला वनस्पती ठेवल्यास घरात धनप्राप्ती होते. कारण ही दिशा भगवान कुबेराशी संबंधित आहे असे मानली जाते.
घराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला क्रासुला वनस्पती ठेवणे योग्य मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते, असे मानले जाते.
फेंगशुईनुसार घराच्या दक्षिण दिशेला क्रासुलाची वनस्पती लावणे मात्र टाळावे. यामुळे नकारात्मक परिणाम होऊ शकतात.
फेंगशुईनुसार क्रासुला वनस्पतीचे रोप अशा ठिकाणी लावा, जिथे सूर्यप्रकाश झाडावर पडतो. झाडाला नियमित पाणी द्या, पण माती ओली होणार नाही याची काळजी घ्या. आठवड्यातून ३-४ वेळा पाणी देऊ शकता.
फेंगशुई ही एक प्राचीन चिनी कला आहे. या कलेचा प्रसार जगभर झालेला आहे. फेंगशुई याचा अर्थ, "वारा आणि पाण्याचा मार्ग". फेंगशुई्च्या टिप्स या घर आणि कामाच्या ठिकाणाच्या डिझाइन आणि सजावटीशी संबंधित आहेत. फेंगशुईनुसार काही नियमांचे पालन केले किंवा काही उपाय केले गेले तर, घरात सकारात्मक ऊर्जा वाढवून नकारात्मकता कमी करता येते, अशी मान्यता आहे.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या