Marathi Feng Shui Tips: फेंगशुईमध्ये घरात घोड्याची नाळ लावणे सुख-शांती आणि समृद्धिदायक मानले जाते. असे मानले जाते की, हे घरात ठेवल्याने सकारात्मक उर्जेचा संचार होतो आणि घरात भरभराट येते. घरातील सुख-शांतीसह आर्थिक समस्यांपासून मुक्त होण्यासाठीही हे फायदेशीर मानले जाते. फेंगशुईमध्ये घोड्याच्या नालेचा आकार भाग्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. असे म्हटले जाते की, घोड्याची नाळ लावल्याने कुटुंबातील सदस्यांचे वाईट शक्तींपासून संरक्षण होते. मात्र, चांगल्या परिणामासाठी ते लावताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. चला तर मग जाणून घेऊ या, घरात घोड्याची नाळ लावण्याचे नियम...
सुख-शांती, सौभाग्य आणि सुरक्षिततेसाठी घोड्याची नाळ मुख्य दरवाजाच्या वर लावावी. किंवा मग मुख्य दरवाजाच्या चौकटीबाहेर वरच्या दिशेला लावली पाहिजे.
घोड्याच्या टापांना लावलेली घोड्याची असली नाळ अत्यंत भाग्यवान मानली जाते. घोड्याच्या पायाला लावलेली नाळ मिळवणे हे सहजसोपे काम नाही. पण ती मिळवताना घोड्याला कोणत्याही प्रकारे त्रास देऊन किंवा सतावून घोड्याची नाळ मिळवू नये.
जर आपल्याला खरी घोड्याची नाळ सापडली तर आपण त्वरित ती तुम्ही तुमच्या दाराच्या वर लावू शकता.
घोड्याची नाळ यू आकाराची आहे, दरवाजावर ठेवताना ती यू आकारात आहे की नाही याची खात्री करा. असे मानले जाते की घोड्याची नाळ लावण्याचा हा खरा आणि उत्तम मार्ग आहे.
फेंगशुईनुसार, घोड्याची नाल धातूची असते. या कारणास्तव, ते पूर्व आणि दक्षिण-पूर्व दिशेभिमुख असलेल्या दरवाजांवर ठेवू नये असा सल्ला दिला जातो.
पश्चिम, वायव्य आणि उत्तर दिशेला घोड्याची नाळ लावणे शुभ आणि परिणामकारक मानले जाते.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या