Marathi Feng Shui Tips : फेंगशुईनुसार जीवनात सकारात्मक ऊर्जेच्या संचारासाठी लाफिंग बुद्धा, चिनी नाणी, फेंगशुई वनस्पती, क्रिस्टल बॉल, कासव, पिरॅमिड यासह अनेक गोष्टी घरात ठेवणे खूप भाग्यवान मानले जाते. असे मानले जाते की यामुळे घरात सुख-समृद्धी येते. फेंगशुईमध्ये घरी फिशटँकमध्ये ठेवणे देखील फायदेशीर मानले जाते. अनेक रंगीबेरंगी मासे मत्स्यालयात ठेवले जातात. परंतु ॲरोवाना मासा फिशटँकमध्ये ठेवणे चांगले मानले जाते. ॲरोवाना मासा सुख आणि सौभाग्यवाढीचे प्रतीक मानला जातो. चला जाणून घेऊ या, ॲरोवाना मासे घरी ठेवण्याचे फेंगशुई टिप्स आणि फायदे.
ॲरोवाना मासा हा रुपेरी रंगाचा असतो. हा मासा ऑफिस किंवा घरातील फिशटँकमध्ये ठेवला जातो.
फेंगशुईनुसार फिशटँकमध्ये हा फक्त एकच मासा ठेवला ठेवला जातो. या माशासोबत दुसरा कोणताही मासा फिशटँकमध्ये ठेवला जात नाही.
सुख-सौभाग्याच्या वाढीसाठी फिशटँक वायव्य किंवा आग्नेय दिशेला ठेवावे. यामुळे आनंद, सुखशांती, सौभाग्य प्राप्त होते, असे म्हटले जाते.
जर तुम्हाला घरात फिशटँक ठेवायचे नसेल तर तुम्ही ईशान्य किंवा पूर्व दिशेला ॲरोवाना माशाची मूर्ती किंवा प्रतिकृती देखील ठेवू शकता. असे मानले जाते की, यामुळे घरात सुख आणि संपत्ती येते.
फेंगशुईनुसार फिशटँकमध्ये ॲरोवाना मासा ठेवल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार सुरू होता. घरातील सुखशांती, समृद्धी आणि आनंदासाठी याचा उपयोग होत असतो.
फेंगशुईमध्ये ॲरोवाना मासा धन, सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो.
फेंगशुईनुसार, आग्नेय दिशेला मत्स्यालयात ॲरोवाना मासा ठेवल्यास तिजोरी पैशांनी भरलेली राहते आणि पैशांची कमतरता भासत नाही, असे मानले जाते.
त्याचबरोबर उत्तर दिशेला फिशटँक ठेवल्यास व्यावसायिक जीवनात प्रगतीच्या महत्त्वाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
आपल्या घरात माशाचा फिशटँक हा पूर्व दिशेला ठेवावा. असे केल्याने ते घरातील लोकांचे आरोग्य सुधारण्यास उपयुक्त ठरू शकते, अशी फेंगशुईनुसार मान्यता आहे.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.