Marathi Fengshui Tips: चिनी वास्तुशास्त्र फेंगशुईमध्ये हसणाऱ्या बुद्धाची मूर्ती घरात ठेवणे शुभ मानले जाते. लाफिंग बुद्धाला धनाच्या देवतांपैकी एक मानले जाते. मान्यतेनुसार घरात लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवल्यास धन, यश आणि आर्थिक समृद्धी मिळते. कुटुंबातील सदस्यांच्या पैशांशी संबंधित समस्या दूर होतात आणि जीवनात सुख-शांती राहते. मात्र चांगल्या परिणामासाठी लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवताना फेंगशुईचे काही नियम पाळणे महत्वाचे मानले जाते. जाणून घेऊया लाफिंग बुद्धाचा पुतळा बसविण्याचे नियम...
फेंगशुईनुसार आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवण्यात यावी. असे मानले जाते की, मुख्य दरवाजासमोर लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. यामुळे आपले संपूर्ण घर सकारात्मक ऊर्जेने भरून जाते.
जर तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारासमोर लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवता येत नसेल तर ती मुख्य प्रवेशद्वारासमोर असेल अशा प्रकारे टेबलावर किंवा कोपऱ्यावर ठेवू शकता. तसेच हसणाऱ्या बुद्धाचा चेहराही मुख्य दरवाजाकडे असावा.
हे लक्षात असू द्या की, फेंगशुईमध्ये लाफिंग बुद्धाची मूर्ती बेडरूममध्ये कधीही ठेवू नका. त्याच प्रमाणे मूर्ती डायनिंग रुममध्ये देखील ठेवू नये, असा सल्ला दिला जातो.
फेंगशुईच्या नियमांनुसार लाफिंग बुद्धाची मूर्ती मंदिरात किंवा घरातील पूजेमध्ये ठेवू नये हे देखील कायमचे लक्षात ठेवावा. याचे कारण म्हणजे लाफिंग बुद्धाच्या मूर्तीची पूजा केली जात नाही. लाफिंग बुद्धाची मूर्ती केवळ सजवून ठेवली जाते.
आपल्याला शुभ लाभ किंवा परिणाम मिळावेत यासाठी लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात सजवून ठेवणे चांगले मानले जाते. लाफिंग बुद्धाची मूर्ती घराच्या पूर्व दिशेला ठेवावी. असे म्हटले जाते की, यामुळे घरातील वातावरण चांगले राहते आणि कौटुंबिक जीवनात सुख-शांती देखील राहते.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या