Feng Shui: फेंगशुईनुसार घराचा दिवाणखाना कसा असावा? जाणून घ्या लाभदायक टिप्स!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Feng Shui: फेंगशुईनुसार घराचा दिवाणखाना कसा असावा? जाणून घ्या लाभदायक टिप्स!

Feng Shui: फेंगशुईनुसार घराचा दिवाणखाना कसा असावा? जाणून घ्या लाभदायक टिप्स!

Nov 18, 2024 05:36 PM IST

Feng Shui Tips in Marathi: जीवनात सकारात्मक ऊर्जेच्या संचारासाठी फेंगशुईशी संबंधित काही टिप्स खूप फायदेशीर मानल्या जातात. फेंगशुईनुसार ड्रॉइंग रूमशी संबंधित काही वास्तु टिप्स जीवनात सुख-समृद्धी आणतात.

फेंगशुईनुसार घराचा दिवाणखाना कसा असावा? जाणून घ्या लाभदायक टिप्स!
फेंगशुईनुसार घराचा दिवाणखाना कसा असावा? जाणून घ्या लाभदायक टिप्स!

Marathi Feng shui Tips: जीवनात सुख-आनंदासाठी वास्तुचे काही नियम पाळणे बंधनकारक मानले गेले आहे. त्याचप्रमाणे जीवनात सकारात्मकता वाढवण्यासाठी आणि अडथळे कमी करण्यासाठी फेंगशुईनुसार सांगितलेल्या काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं मानलं गेलं आहे. मान्यतेनुसार जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होण्यासाठी घरातील दिवाणखान्याचा (Drawing Room) रंग, त्याची सजावट, सोफा ज्या जागेवर ठेवायचा आहे ते लोकेशन यासह काही खास गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. अशी काळजी घेतली गेल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. या बरोबर कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होत असते. चला जाणून घेऊया फेंगशुईनुसार ड्रॉइंग रूम कशी असावी?

दिवाणखान्यासाठी फेंगशुई टिप्स

> फेंगशुईनुसार दिवाणखान्यात जास्त आवाज होऊ नये हे लक्षात ठेवावे. दिवाणखान्यात शांतता असणे आवश्यक मानले गेले आहे.

> दिवाणखान्यात खोलीच्या मधोमध खुर्ची ठेवू नये. यामुळे अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे दिवाणखान्यातील मधली जागा रिकामी किंवा मोकळी ठेवावी.

> फेंगशुईनुसार सोफा दरवाजाच्या अगदी समोर ठेवावा, जेणेकरून त्यावर बसलेल्या व्यक्तीला दरवाजा स्पष्ट दिसेल. सोफा दरवाजाच्या अगदी समोर ठेवणे शक्य होत नसेल, तर दरवाजाच्या विरुद्ध बाजूस आरसा लावावा. जेणेकरून सोफ्यावर बसलेल्या व्यक्तीला दरवाजा आरशात स्पष्टपणे दिसू शकेल.

> या खोलीत जास्तीत जास्त हलक्या रंगाचे पडदे वापरावेत. असे केल्याने दिवाणखान्यात जास्तीत जास्त प्रकाश खोलीच्या आत येऊ शकेल. यामुळे तुम्हाला बसताना प्रसन्न देखील वाटेल.

> दिवाणखान्यात आरसे आणि झाडे म्हणजेच छोटी रोपे व्यवस्थित सजवावून ठेवावीत. या खोलीत मऊ सोफा आणि रंगसंगती जुळणाऱ्या कुशन असाव्यात.

> तुमच्या दिवाणखान्यात जर गडद रंगाचा सोफा असेल तर अशा सोफ्यावर हलक्या रंगाच्या कुशन वापरा.

> दिवाणखाना ईशान्य दिशेला असेल तर या खोलीत निळ्या रंगाचा जास्त वापर करावा. तसेच तुमच्या दिवाणखान्याच्या खिडक्या मोठ्या असाव्यात.  मोठ्या खिडक्या असल्यामुळे हवाही खेळती राहील, तसेच दिवाणखान्यात सूर्यप्रकाश देखील पुरेसा येईल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner