Mrathi Feng Shui Tips: अनेकदा खूप प्रयत्न करूनही व्यक्तीला कधीकधी कामात यश मिळत नाही. मन निरुत्साही राहते आणि आरोग्यही चांगले राहत नाही. हा आपल्या घरात असलेल्या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम असू शकतो. घरातील ऊर्जेचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावरही दिसून येतो. फेंगशुई शास्त्रानुसार काही उपाय केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढवता येते. तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट देखील करता येते. फेंगशुईमध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचे काही सोपे उपाय सांगितले आहेत. जाणून घेऊ या, काय आहेत हे सोपे उपाय.
फेंगशुई विद्येनुसार नुसार घरात पाण्याचे कारंजे ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. पाण्याचे कारंजे ठेवल्याने घरातील ऊर्जेचा समतोल राखण्यास मदत होते. फक्त हे लक्षात ठेवा की कारंज्याचे पाणी स्वच्छ आणि वाहणारे असावे. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते. पाण्याचे कारंजे हे उत्तर दिशेला ठेवावे.
फेंगशुईशास्त्रात चिनी नाण्यांना खूप महत्त्व आहे. ही नाणी लाल कापडात बांधून टांगल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सुख-समृद्धीचा वास होतो, असे मानले जाते.
जेड वनस्पती खूप भाग्यवान मानली जाते. असे मानले जाते की ही वनस्पती घराच्या प्रवेशद्वारावर ठेवल्याने सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. या वनस्पतीमुळे प्राणवायू तर वाढेलच, शिवाय सुख-समृद्धीही वाढेल.
जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत असाल तर तुमच्या घरी फिशटँक आणा. फेंगशुईनुसार घरात फिशटँक ठेवल्याने सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. तसेच पैशांशी संबंधित समस्या देखील कमी होतात.
फेंगशुई नुसार घरात तीन पायांचा बेडूक ठेवणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. घरात तीन पायांचा बेडूक ठेवल्यास घराची समृद्धी टिकून राहते. बहुतेक फेंगशुई बेडूक मुख्य दरवाजासमोर ठेवावे. बेडकाचे तोंड हे घरासमोर आहे याची खात्री करा. धन आकर्षित करण्यासाठी शुभ मानले जाते.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या