Feng Shui Tips In Marathi : जीवनात सकारात्मक ऊर्जेच्या संचारासाठी फेंगशुईशी संबंधित काही उपाय खूप फायदेशीर मानले जातात. फेंगशुईनुसार जीवनात सकारात्मक ऊर्जेच्या संचारासाठी लाफिंग बुद्धा, चिनी नाणी, फेंगशुई वनस्पती, क्रिस्टल बॉल, कासव, पिरॅमिड यासह अनेक गोष्टी घरात ठेवणे खूप भाग्यवान मानले जाते. असे मानले जाते की यामुळे घरात सुख-समृद्धी येते. फेंगशुईमध्ये घरी फिश अॅक्वेरियम ठेवणे देखील फायदेशीर मानले जाते. अनेक रंगीबेरंगी मासे अॅक्वेरियममध्ये ठेवले जातात, परंतु आरोवाना मासा अॅक्वेरियममध्ये ठेवणे खुप शुभ मानले जाते. आरोवाना मासा सुख आणि सौभाग्यवाढीचे प्रतीक मानला जातो. चला जाणून घेऊया आरोवाना मासे घरी ठेवण्याचे फेंगशुई टिप्स आणि फायदे.
आरोवाना मासा हा चांदीच्या रंगाचा असतो. हा मासा,ऑफिस किंवा घरातील अक्वेरियममध्ये ठेवला जातो. फेंगशुईनुसार हा मासा अॅक्वेरियममध्ये एकटाच ठेवला जातो. सुख-सौभाग्य वाढीसाठी मत्स्यालय वायव्य किंवा आग्नेय दिशेला ठेवावे. यामुळे सौभाग्य प्राप्त होते, असे म्हटले जाते.
बऱ्याच लोकांना घरात मत्स्यालय ठेवायचे नसते किंवा ते स्थापित करणे आणि आरोवाना मासे ठेवणे महाग असते, त्याऐवजी तुम्ही तुलनेने स्वस्त आरोवाना माशाची मूर्ती देखील ठेवू शकता. घराच्या ईशान्य किंवा पूर्व दिशेला आरोवाना माशाची मूर्ती ठेवणे अधिक फायदेशीर ठरू शकते. असे मानले जाते की यामुळे घरात सुख-समृद्धीही येते. घरामध्ये आरोवाना माशाच्या तोंडात नाणे असलेली मूर्ती ठेवणे खूप शुभ मानले जाते.
फेंगशुईनुसार अॅक्वेरियममध्ये आरोवाना मासा ठेवल्याने नकारात्मकता दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संच तयार होतो. फेंगशुईमध्ये आरोवाना मासा धन, सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. आग्नेय दिशेला मत्स्यालयात आरोवाना मासा ठेवल्यास पैशांचा बक्कळ साठा राहतो आणि पैशांची कमतरता भासत नाही, असे मानले जाते. त्याचबरोबर उत्तर दिशेला मत्स्यालय ठेवल्यास व्यावसायिक जीवनात प्रगतीच्या महत्त्वाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. पूर्व दिशेला ठेवलेले मत्स्यालय आरोग्य सुधारण्यास उपयुक्त ठरू शकते.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)