Feng Shui Tips: फेंगशुई हे दोन शब्दांनी बनलेले एक लोकप्रिय चिनी शास्त्र आहे. फेंगशुईमध्ये अनेक टिप्स सांगितल्या आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्टडी रूमची एनर्जी पॉझिटिव्ह बनवू शकता. फेंगशुई शास्त्रानुसार घरात काही गोष्टी ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा राहते आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे तुम्हालाही स्टडी रूममध्ये पॉझिटिव्ह एनर्जी हवी असेल तर फेंगशुईच्या या भाग्य बदलणाऱ्या गोष्टी खूप उपयुक्त ठरू शकतात.
तुमच्या स्टडी रुममध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवायचा असेल तर फेंगशुईचा एज्युकेशन टॉवर घरी आणा. अभ्यासिकेच्या उत्तर दिशेला तो एज्युकेशन टॉवर लावावा. फेंगशुई शास्त्रानुसार एज्युकेशन टॉवर ठेवल्यास मुलांची एकाग्रता शक्ती वाढण्यास मदत होईल.
विंड चाइम ही एक लकी फेंगशुई आयटम आहे. ही विंड चाइम भाग्यला व्यक्तीकडे आकर्षित करते आणि सकारात्मकता राखते. यामुळे स्टडी रूमची निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी विंड चाइम लावा.
बांबूचे झाड घरासाठी खूप भाग्यवान मानले जाते. अभ्यासकक्षात पूर्व दिशेला बांबूचे झाड लावल्यास अभ्यासिकेतील सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढू शकतो. घरात बांबूचे झाड लावल्याने कुटुंबात सुख-समृद्धी टिकून राहते.
मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी स्टडी रूममध्ये क्रिस्टल बॉल ठेवावा. क्रिस्टल बॉल ठेवल्याने स्टडी रूममध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते.
फेंगशुईनुसार लाफिंग बुद्धाला घरात ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. लाफिंग बुद्धा घरात ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. बहुतेक लाफिंग बुद्धा मुख्य दरवाजासमोर ठेवावेत, जेणेकरून घरात प्रवेश करताच लाफिंग बुद्धाचे पहिले दर्शन होईल.
फेंगशुई ही चिनमधील मूळची एक प्राचीन प्रथा आहे. एक शात्र आहे. घरामध्ये योग्य ठिकाणी वस्तू मांडणे आणि ठेवणे याबाबत टिप्स देणारी ती एक प्राचीन कला आहे. फेंगशुईनुसार, वस्तूंच्या घरात कोणत्या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत त्यानुसार घरातील ऊर्जेच्या प्रवाहावर परिणाम होतो, असे फेंगशुईशास्त्र सांगते.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या