Feng Shui Tips For Financial Progress In Marathi : फेंगशुई हे एक प्राचीन चिनी तत्वज्ञान आहे जे तुमच्या घरात आणि कामाच्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा वाढवण्यावर लक्ष केंद्रित करते. असे मानले जाते की, ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनात सुख-समृद्धी, आरोग्य आणि आनंद आणू शकते. फेंगशुई दोन शब्दांपासून बनलेली आहे. फेंग म्हणजे हवा आणि शुई म्हणजे पाणी. फेंगशुई विज्ञान पाणी आणि हवेवर आधारित आहे असे सांगितले जाते.
फेंगशुईमध्ये असे अनेक उपाय सुचवले आहेत, जे आनंदी जीवनासाठी खूप प्रभावी ठरतात. फेंगशुईच्या काही वस्तू घरात, ऑफीसमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवल्याने नशीब चमकू लागते. चला जाणून घेऊया फेंगशुईच्या या सोप्या टिप्स.
फेंगशुईनुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर चटई किंवा डोअरमॅट ठेवणे खूप शुभ असते. मुख्य प्रवेशद्वारावर ठेवल्याने घरात सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते. असे मानले जाते की, यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही आणि घरात सुख-शांती राहते.
फेंगशुईमध्ये घराच्या दाराजवळ एक सुंदर फेंगशुई प्लेट ठेवणे देखील खूप शुभ मानले जाते. दाराजवळ सुंदर फेंगशुई प्लेट ठेवल्याने घर आनंदाने भरलेले राहते. दारावर फेंगशुई प्लेट ठेवल्याने अतीथींचे स्वागतही सकारात्मकतेने होते. त्यामुळे घरात येणाऱ्यांना एक सुखद अनुभव येतो. दारावर फेंगशुई प्लेट ठेवल्याने घरातील वातावरण सकारात्मक आणि अनुकूल बनते.
जर तुम्ही व्यवसाय करत असाल आणि तुम्हाला व्यवसायात नफा मिळत नसेल तर तुम्ही लाफिंग बुद्धा दुकानात आणा. दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील भिंतीवर अशा हा लाफिंग बुद्धा अशा प्रकारे लावा की, ग्राहक दुकानात प्रवेश करताच, त्यांची पहिली नजर लाफिंग बुद्धावर पडली पाहिजे. या उपायामुळे व्यवसायात लवकरच भरभराट होईल.
व्यवसायात फायद्यासाठी उत्तर दिशेला धातूचे कासव ठेवा. दुकानाच्या उत्तर दिशेला तुम्ही जहाजही ठेवू शकता. जहाज अशा प्रकारे ठेवा की ते आतील बाजूस येत आहे. त्यामुळे व्यवसायात भरभराट होते असे मानले जाते.
फेंगशुईमध्ये तीन चिनी नाणी संपत्तीचे प्रतीक मानले जातात. फेंगशुईनुसार ही चिनी नाणी घरात ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. नाणी सोबत ठेवल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. या नाण्यांमुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात चांगले वातावरण निर्माण होते.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)