Feng Shui Tips: घराची सजावट करताना फेंगशुईच्या या गोष्टी लक्षात ठेवा, होतील मोठे लाभ!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Feng Shui Tips: घराची सजावट करताना फेंगशुईच्या या गोष्टी लक्षात ठेवा, होतील मोठे लाभ!

Feng Shui Tips: घराची सजावट करताना फेंगशुईच्या या गोष्टी लक्षात ठेवा, होतील मोठे लाभ!

Nov 29, 2024 10:50 PM IST

Feng Shui Tips: आयुष्य सुखी आणि समृद्ध होण्यासाठी फेंगशुईचे काही नियम पाळणे आवश्यक मानले जाते. असे मानले जाते की फेंगशुईच्या काही तत्त्वांच्या मदतीने एखाद्या व्यक्तीची बिघडलेली किंवा अडलेली कामे होतात.

घराची सजावट करताना फेंगशुईच्या या गोष्टी लक्षात ठेवा, होतील मोठे लाभ!
घराची सजावट करताना फेंगशुईच्या या गोष्टी लक्षात ठेवा, होतील मोठे लाभ!

Feng Shui Tips for Prosperity and Happiness: घराचे बांधकाम असो किंवा घराची सजावट, धन, ऐश्वर्य, सुख आणि सुखी जीवनासाठी फेंगशुईमध्ये अनेक वेगवेगळे उपाय सांगितले गेले आहेत. या नियमांचे पालन केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, असे मानले जाते. कुटुंबात आनंदाचे वातावरण तयार होते. फेंगशुईच्या काही तत्त्वांचा अवलंब केल्यास घरात सुख, समृद्धी आणि शांती प्रस्थापित होऊ शकते. घराच्या सजावटीमध्ये फेंगशुईचे काही नियम पाळल्याने कुटुंबातील सदस्यांची बरीच प्रगती होते, असे म्हटले जाते. चला तर मग जाणून घेऊ या घराच्या सजावटीशी संबंधित फेंगशुई टिप्स...

घराच्या सजावटीशी संबंधित फेंगशुई टिप्स

फेंगशुईमध्ये आपल्या घरात विशिष्ट ठिकाणी चित्रे किंवा फोटोफ्रेम लावण्याबाबत सांगितले गेले आहे. त्यानुसार आपल्या घरात उत्तरे दिशेला धबधब्याचे चित्र लावावे. त्याच प्रमाणे काळ्या किंवा निळ्या रंगाचा फोटो लावावा. असे केल्याने तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळू शकतात.

या बरोबरच घरात ईशान्य दिशेला फेंगशुईचे दिवे लावल्यास यात्रा तुमचे प्रवास यशस्वी होतात, असे मानले जाते.

आग्नेय दिशेला स्वच्छतेची काळजी घ्या!

आग्नेय दिशेला स्वच्छतेची विशेष काळजी घ्यायला हवी असे फेंगशुईमध्ये म्हटले आहे. आपण या दिशेला एखादे कपाट ठेवू शकता. या बरोबरच आपण या दिशेला फिशटँक देखील ठेवू शकता.

घराच्या दिशेला कोणतेही चित्र नको!

घराच्या दक्षिण दिशेला कोणतेही चित्र लावू नका. या दिशेला तुम्ही बेडरूम बनवू शकता आणि डायनिंग टेबल देखील ठेवू शकता.

पश्चिम दिशेला धातूच्या फ्रेममध्ये चित्र लावा!

फेंगशुईनुसार घराची पश्चिम दिशा प्रेम आणि कौटुंबिक उन्नतीशी जोडलेली गेलेली असते. त्यामुळे या दिशेला धातूच्या फ्रेममध्ये चित्र लावावे. त्याने लाभ होऊ शकतात.

घरात ठेवा क्रिस्टल बॉल!

घराच्या सुख-आनंदासाठी तुम्ही घरात क्रिस्टल बॉल ठेवू शकता. वैवाहिक जीवनातील कटुता कमी करण्यासाठी बेडरूमच्या नैऋत्य कोपऱ्यात क्रिस्टल बॉल ठेवू शकता. यामुळे नात्यांमध्ये गोडवा येतो, असे मानले जाते.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner