Feng Shui Tips For Home In Marathi : फेंगशुईमध्ये घराच्या सुख-समृद्धीसाठी लाफिंग बुद्धा, विंड चाइम, फिश अॅक्वेरियम, चायनीज कॉइन, क्रिस्टल बॉल सह काही गोष्टी ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. जीवनातील सर्व दु:खे आणि दारिद्रय दूर होऊन कौटुंबिक जीवनही सुखी होते. याशिवाय वास्तुप्रमाणेच फेंगशुई मध्येही वास्तुदोष टाळण्यासाठी काही नियम आहेत. असे म्हटले जाते की या नियमांचे पालन केल्याने घरात सुख-समृद्धी येते. चला जाणून घेऊया फेंगशुईच्या १० सोप्या टिप्स...
फेंगशुईनुसार घरातील मुख्य दरवाजासमोर शौचालय असू नये. फेंगशुईनुसार मुख्य प्रवेशद्वारासमोर गोल घुमट असू नये.
फेंगशुईमध्ये अरोवाना मासा सुख-समृद्धीचे प्रतीक मानला जातो. घर किंवा ऑफिसमध्ये सौभाग्य वाढवण्यासाठी तुम्ही अॅक्वेरियम वायव्य किंवा आग्नेय दिशेला ठेवू शकता.
फेंगशुईनुसार घर बांधताना एकाच दिशेला तीन दरवाजे असू नयेत हे लक्षात घेतले पाहिजे. याचा कुटुंबातील सदस्यांवर नकारात्मक परिणाम होतो, असे मानले जाते. त्यामुळे त्यात तातडीने बदल करण्यात यावा.
सुख आणि सौभाग्य वाढवण्यासाठी आपल्या घरात ओम आणि स्वस्तिक सारखी शुभ चिन्हे बनवा.
फेंगशुईनुसार घराच्या दरवाजाच्या हँडलवर घंटा किंवा नाणी टांगली पाहिजेत.
लाल कापडात तीन चिनी नाणी बांधून दरवाजाच्या हँडलवर बाहेरच्या बाजूला टांगून ठेवू शकता. असे मानले जाते की, यामुळे घरातील सर्व सदस्यांना खूप शुभ फळ मिळते.
फेंगशुईनुसार फ्रीज घराच्या पश्चिम किंवा नैऋत्य दिशेला ठेवल्यास कौटुंबिक समृद्धी आणि शांती वाढते, परंतु दक्षिण दिशेला ठेवल्यास त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. त्याचप्रमाणे मायक्रोवेव्ह घराच्या नैऋत्य दिशेला ठेवणे उत्तम मानले जाते.
तुटलेल्या-फुटलेल्या भांड्यांचा आणि वस्तूंचा वापर करू नये, असे मानले जाते की, हे दुर्दैवाचे प्रतीक आहे. त्यामुळे अशा वस्तूंना आणि भांड्यांना तात्काळ घराबाहेर काढावे.
फेंगशुईनुसार घरातील मुख्य दरवाजा आणि स्वयंपाकघराजवळ शौचालय असू नये. घराच्या उत्तर दिशेला शौचालय बांधता येते. दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला शौचालय नसावे.
वाळलेली आणि सुकलेली फुले किंवा रोपटे घरात ठेवू नयेत. असे मानले जाते की ते घरात कुठेही ठेवल्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. त्यामुळे ताबडतोब काढून टाका.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या