मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Feng Shui Tips : फेंगशुईनुसार या गोष्टी घरात ठेवल्यास येते आर्थिक सुबत्ता, दूर होतात अडचणी

Feng Shui Tips : फेंगशुईनुसार या गोष्टी घरात ठेवल्यास येते आर्थिक सुबत्ता, दूर होतात अडचणी

Jul 23, 2023 01:05 AM IST

Feng Shui : घरात किंवा ऑफिसमध्ये काही फेंगशुई टिप्स वापरल्यास घरातले दोष दूर होतात असं सांगण्यात येतं. त्या टिप्स कोणत्या आहेत हे पाहूया.

फेंगशुई टिप्स
फेंगशुई टिप्स (HT)

फेंगशुई हे प्राचीन चिनी वास्तुशास्त्र आहे जे भारतातही खूप प्रसिद्ध आहे. फेंगशुईच्या या उपायांचा अवलंब केलंयास घरातले वास्तुदोषही दूर होतात. फेंगशुीत सांगितलेल्या गोष्टी घर किंवा ऑफिसमध्ये ठेवल्याने सर्व समस्या दूर होतात असं सांगितलं जातं. या उपायांनी तुमच्या घरातली नकारात्मक उर्जा निघून जाते आणि सकारात्मक उर्जा येते. 

लाफिंग बुद्धा : लाफिंग बुद्धा जगभरात प्रसिद्ध आहे. घरात लाफिंग बुद्धा ठेवल्यास त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात. घरात सुख समृद्धी वाढते, आर्थिक अडचण येत असल्यास ती दूर होते. आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी घराच्या मध्यभागी लाफिंग बुद्धा ठेवावा असं सांगितलं जातं.

फेंगशुई नाणी : घरात संपत्ती येण्यासाठी तीन फेंगशुईची नाणी एका लाल कपड्यात गुंडाळा आणि त्याला घराच्या प्रवेशाच्या ठिकाणी लटकवा. दाराच्या आतील बाजूस ही नाणी राहातील यांची काळजी घ्या. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

गोल टेबल : फेंगशुईनुसार हॉलमध्ये एक गोलाकार टेबल ठेवावं. असं केल्याने घरात सुखशांती नांदते आणि समृद्धी येते असं फेंगशुई सांगतं.

फिश टँक: फेंगशुईनुसार घरात फिस टँक ठेवावा. घरात असलेला फिश टँक घरातली समृद्धी वाढवते. घरात आनंद आणते.

पिरॅमिड : घरात आर्थिक समृद्धी नांदावी यासाठी घराच्या कोपऱ्यात पिरॅमिड लावलं जातं. याशिवाय तुम्ही पिरॅमिड घराच्या पूर्व दिशेलाही ठेवू शकता. घराची पूर्व दिशा यासाठी अत्यंत शुभ मानली जाते.

पाई याओ: पाई याओ ही जोडी घराच्या मुख्य दरवाज्यावर लावावी. ही जोडी घराच्या मुख्य दारावर लावल्यास घरात धन संपत्ती वाढते, लाभाचे स्त्रोत वाढतात असा विश्वास व्यक्त केला जातो.

फेंगशुई बुल : फेंगशुई बुल घराच्या दिवाणखान्याच्या दक्षिण दिशेला ठेवल्याने चांगले परिणाम मिळतात. पैसा आणि व्यवसायात सुधारणा होईल. फेंगशुई बुल घरात ठेवल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि संपत्ती मिळते असं काहीचं म्हणणं आहे.

 

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग