मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  February 2024 : फेब्रुवारी महिना या ४ ग्रहांच्या राशी बदलाचा, या ३ राशींची होईल हटके कमाई

February 2024 : फेब्रुवारी महिना या ४ ग्रहांच्या राशी बदलाचा, या ३ राशींची होईल हटके कमाई

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 30, 2024 10:13 PM IST

February 2024 astrological prediction : वर्ष २०२४ चा जानेवारी महिना संपून आता फेब्रुवारी महिन्याला सुरवात होईल. हा महिना कोणत्या ग्रह-नक्षत्राच्या बदलांनी खास होईल, कोणत्या राशींची हटके कमाई होईल जाणून घ्या.

February 2024 astrological prediction
February 2024 astrological prediction

फेब्रुवारी महिन्यात ४ ग्रहांचे राशीपरिवर्तन होणार आहे. सूर्य, मंगळ, शुक्र आणि बुध या ग्रहांच्या बदलाने काही राशींचे भाग्य बदलू शकते. यामुळे हा महिना खास राहील. फेब्रुवारीच्या सुरवातीलाच १ फेब्रुवारीला बुध ग्रहाचे, ५ फेब्रुवारीला मंगळ ग्रहाचे संक्रमण होईल. यानंतर १२ फेब्रुवारीला शुक्र ग्रहाचे राशीपरिवर्तन होईल, १३ फेब्रुवारीला सूर्याचे राशीपरिवर्तन होईल. या महिन्यात बुध, मंगळ, सूर्य आणि शुक्र ग्रहाच्या राशीबदलाचा काही राशींना लाभ होऊ शकतो. या राशींचे नशीब पालटू शकते. यामुळे जाणून घेऊया सूर्य, मंगळ, शुक्र आणि बुध ग्रहाच्या राशीपरिवर्तनाचा कोणकोणत्या राशींना जबरदस्त लाभ होणार आहे.

मेष

मेष राशीसाठी फेब्रुवारी महिना फार फायदेशीर ठरेल. बुध, मंगळ, सूर्य आणि शुक्राचे राशीपरिवर्तन तुम्हाला अनेक लाभ देतील. जे लोकं नोकरीच्या शोधात आहे त्यांचे स्वप्न पूर्ण होईल. आर्थिक बाबतीत मजबूत राहण्यासाठी तुम्ही गुंतवणूकीसोबत बचतीवरही लक्ष द्यावे. खाण्यापिण्याची पथ्य पाळल्यास स्वत:चे आरोग्य सुदृढ ठेऊ शकतात.

Budh Rahu Yuti : बुध राहू युती; १५ वर्षानंतर घडतोय असा संयोग, या ३ राशींचे आयुष्य बदलेल

धनु

सूर्य, मंगळ, शुक्र आणि बुध ग्रहाच्या बदलाचा धनु राशीला लाभ होईल. करिअरमध्ये तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचा खास पाठींबा मिळेल आणि नवीन आव्हानही मिळतील. आर्थिक वृद्धीसाठी अनेक चांगल्या संधीचा लाभ होईल, परंतू तुमच्यावरही आहे की तुम्ही कोणता निर्णय केव्हा घ्याल. संशोधन करून योग्य आर्थिक निर्णय घेतल्यास दुप्पट-तिप्पट लाभाचे योग आहेत.शारिरीक व मानसिक सुंदरता ठेवण्यासाठी बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळा.

मकर

बुध, मंगळ, सूर्य आणि शु्क्र ग्रह यांच्या राशीबदलामुळे मकर राशीला अनेक फायदे होतील. व्यापारात अनेक नवीन संधी तुमच्या पदरी पडतील. आर्थिक स्थितीत वृद्धी होईल, पण काही बाबतीत थोडे चढ-उतारही बघायला मिळतील. विचारपूर्वक केलेली गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर राहील. आरोग्याची काळजी घ्यायला विसरू नका.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)