मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Eye Color : अत्यंत चलाख असतात या रंगाच्या डोळ्यांच्या व्यक्ती

Eye Color : अत्यंत चलाख असतात या रंगाच्या डोळ्यांच्या व्यक्ती

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Mar 28, 2023 03:08 PM IST

Secrets Of Eye Color : याच डोळ्यांच्या रंगांवरून त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे सांगितलं जाऊ शकतं.

डोळे सांगतं कसा असेल त्या व्यक्तीचा स्वभाव
डोळे सांगतं कसा असेल त्या व्यक्तीचा स्वभाव (हिंदुस्तान टाइम्स)

डोळ्यांवरती, डोळ्यांच्या सुंदरतेवरती आजवर मराठी हिंदी चित्रपटात शेकडो गाणी बनवली गेली आहेत. डोळे हा शरीराच्या सौदर्याच्या किंवा चेहऱ्याच्या सौंदर्याचा एक अविभाज्य घटक आहेत असं म्हटलं तर ते वावगं ठरु नये. मात्र याच डोळ्यांच्या रंगांवरून त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे सांगितलं जाऊ शकतं. पाहा कोणत्या रंगाच्या डोळ्यांच्या व्यक्ती कशा स्वभावाच्या असतात.

काळे डोळे असणाऱ्या व्यक्ती

या डोळ्यांच्या व्यक्ती काहीशा गूढ स्वभावाच्या असतात. आपलं काम पूर्ण होईपर्यंत ते आपल्या कामाबद्दल फारशी वाच्यता करत नाहीत. ते जे काही करतात ते अत्यंत नियोजनपूर्वक करतात. या व्यक्तींना खूच चांगला सिक्स्थ सेन्स असतो. स्वभावाबद्दल बोलायचं झाला तर या लोकांवर विश्वास ठेवला जाऊ शकतो.

हिरवे डोळे असणाऱ्या व्यक्ती

जिज्ञासू आणि अत्यंत बुद्धीमान व्यक्ती म्हणून हिरव्या रंगाच्या व्यक्तींबद्दल बोललं जाऊ शकतं. ते नेहमी काहीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांची बुद्धीमत्ता हा त्यांचा प्लस असतो. त्यांना नेहमी काहीतरी नवीन शिकण्याची आवड असते, त्यामुळे ते शॉर्ट टाइम कोर्समध्येही पाहायला मिळतात.

तपकिरी डोळे असणाऱ्या व्यक्ती

स्वभावाने खुल्या असतात या डोळ्यांच्या व्यक्ती. यांच्या चेहऱ्याकडे बऱ्याचदा लक्ष जात नाही याचं कारण म्हणजे त्यांचे डोळे. लोकांना स्वतःकडे कसे आकर्षित करायचे हे त्यांना चांगलेच ठाऊक असतं. इतर व्यक्तींही या व्यक्तींच्या सहवासात खुष असतात. त्यांचा आत्मविश्वास हा त्यांच्या व्यक्तिमत्वातला सर्वात महत्वाचा गुण आहे.

राखाडी डोळे असणाऱ्या गोष्टी

खूप मोकळ्या मनाच्या या व्यक्ती असतात. या लोकांना त्यांच्या आयुष्यात स्वातंत्र्य आवडते. ते त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबतही तेच वातावरण राखतात. ते आतून जसे आहेत तसेच ते बाहेरून असतात. अत्यंत रोखठोक स्वरूपाच्या या व्यक्ती असतात. कोणाच्याही पाठीमागे काही बोलणं त्यांना जमत नाही.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग