Employees and Workers Horoscope in Marathi: देशाच्या विकासात नोकरदार आणि कामगार यांचा वाटा मोठा आणि अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणूनच नोकरदार आणि कामगारांना नवे वर्ष २०२५ कसे जाईल हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. जाणून घेऊ या मेष ते मीन या १२ राशींचे नोकदार आणि कामगार वर्गाचे भविष्य काय सांगते
मेष राशीच्या नोकरदार आणि कामगारांपुढे वर्ष २०२५ मध्ये बेकारीचा प्रश्न उद्भवणार नाही. तुम्हांला आश्विन पर्यंतचे महिने त्रासाचे जातील. त्यानंतर कार्तिकनंतरचा काळ बरा जाणार आहे. या वर्षात तुम्हाला निष्कारण मनस्ताप सहन करावा लागू शकतो. तसेच तुमची मानहानी देखील होण्याची शक्यता आहे. तुम्हांला या वर्षाच्या काळात खूपच कष्ट करावे लागणार आहेत. तुमच्यावर बरेच अपमानाचे प्रसंग येतील. मात्र तुम्ही चिडू नका, कारण तुम्ही त्यातून तरुन जाणार आहात.
वृषभ राशीच्या नोकरदार आणि कामगारांपुढे बेकारीचा प्रश्न उद्भवणार नाही. वरिष्ठांची तुमच्यावर मर्जी राहील. श्रावणमहिन्यापर्यंतचा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. मात्र, एकमार्गपणाने वागणे तुमच्या फायद्याचे ठरेल. तुमच्या मनासारखी तुमती बदली होईल. तसेच नेमणूकही तुमच्या मर्जीनुसार होईल. या वर्षाच्या काळात तुम्हाला मन:स्तापाला तोंड द्यावे लागू शकते. तुमच्या जोडीदारीशी तुमचे तंटे होण्याची शक्यता आहे. नवा मित्रपरिवार लाभेल. तुम्ही जर बदलीसाठी प्रयत्न केलेत, तर तुमची योग्य जागी बदली होईल.
वर्ष २०२५ मध्ये तुमच्यावर मोठा कामाचा ताण येणार आहे. तसेच तुमचा मन:स्ताप देखील वाढणार आहे. विनाकारण पैसा खर्च करणे टाळा. बऱ्याच प्रयत्नांनंतर तुम्हांला नवीन नोकरी मिळेल. तुम्ही केलेल्या प्रयत्नांना यश येईल. तुम्हांला बढती मिळेल. तसेच तुमची बदली होईल. आरोग्याची काळजी घ्या. पैशांची चणचण भासेल. आर्थिक व्यवहार अतिशय जपून करा. भाद्रपद मासानंतर त्रास आणि कटकटी जाणवतील.
तुम्हांला तुमची नोकरी कष्टदायक जाणवेल. या वर्षात एखादे संकट आणि कटकटी तयार होतील. तुमचा उताविळपणा तुमच्या अंगलट येईल. खटके उडण्याचा संभव आहे. तुमची नको त्या जागी बदली होईल. मार्गशीष मासापर्यंतचा काळ त्रासदायक आहे. त्यानंतर तुम्हांला चांगले दिवस येतील. तुमचा त्रास कमी व्हावा यासाठी तुमच्या कुलदैवताचे स्मरण करावे. तसेच भगवान शंकराची पूजा करावी.
नवीन वर्षात नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला मनाजोगी जागा मिळेल. आपला कार्यभार उरकून घ्यावा. आळसाचे दिवस निघून जातील तुमची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. श्रावणापर्यंत दिवस चांगले आहेत. मित्रपरिवाराशी सावधपणे वागावे. कुलदेवतेची उपासना करा.
या नव्या वर्षात तुम्हांला नवी नोकरी मिळवणे अतिशय त्रासाचे जाईल. म्हणून सध्या तुमच्या नोकरीत बदल करण्याचा प्रयत्न टाळलेला बरा. हे वर्ष तुम्हांला कष्टाचे जातील. प्रवास टाळावा. अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. अधिकारी वर्गाशी थोडे नमते घेणे तुमच्या हिताचे ठरेल. सहकाऱ्यांशीही मिळतेजुळते घ्या. दिवाळीनंतर तुमचा त्रास कमी होईल. आप्तेष्टांचे सौख्य साधारण राहील. विनाकारण पैसा खर्च होईल. श्री विष्णू सहस्त्रनाम पठण करावे.
नव्या वर्षात तुमची परिस्थिती चांगली राहील. तुम्हांला नवीन नोकरी मिळेल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. पैसाही मिळेल. बरोबरच्या लोकांपासून सावध राहावे. तुमची बढती होण्याची शक्यता आहे. सुरुवातीचे दिवस मात्र त्रासाचे आहेत. तुमचे अनेक हितशत्रू निर्माण होतील. सावधगिरीने काम करावे. अधिकारीवर्गाशी वरचेवर खटके उडतील, त्यांच्याशी तुम्हांला जमवून घ्यावे.
तुमच्या मर्जीप्रमाणे तुमच्या कामात बदल होतील. तुम्ही बदलीचा प्रयत्न करावा. २०२५ हे वर्ष तुम्हांला चांगले जाईल. मात्र अहंकाराने वागू नका. हाताखालच्या लोकांना सांभाळून घ्यावे लागेल. तुमच्याविरुद्ध तुमच्या मागे तुमची बदनामी केली जाईल. तुमचे सहकारी खेळीमेळीने वागतील. तुमच्या योग्यतेचा मान राखला जाईल. रोज मारुतीदर्शन करावे.
नवे वर्ष २०२५ मध्ये जबाबदारी व कामाचा त्रास वाढेल. तुम्हांला श्रावण ते मार्गशीर्ष हा काळ चांगला जाईल. तुम्हांला पैशांची चणचण भासेल. हे वर्ष तुम्हाला मध्यम मानाचे जाईल. मिळकतीचा विचार करता खर्च मात्र जास्त होत राहील. तुम्हांला बदलीसाठी वशिला लावाला लागेल. नको त्या ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे. श्री गणेशाची पूजा करावी.
तुम्ही करत असलेली नोकरी तुम्हांला सोयीची आणि सुख देणारी ठरेल. हे वर्ष तुम्हांला सुखाचे जाईल. मित्रांचे सहकार्य लाभेल. सहकाऱ्यांशी खटके उडण्याचा संभव आहे, त्यांच्याशी जमवून घ्या. अनावश्यक पैसा खर्च होईल. बढतीमुळे त्रास आणि कटकट वाढेल. तब्येतीमुळे कामावर गैरहजर राहाल. श्री मारुती स्त्रोत पठण करावे आणि मारुतीचे दर्शन घ्यावे.
नव्या वर्षात तुम्हांला तुमची प्रगती साधण्यासाठी खूप कष्ट करावे लागणार आहेत. तुमचे वरिष्ठ नाखूश राहतील. या वर्षी तुमची काळजी वाढेल. हे वर्ष तुम्हांला मध्यम स्वरुपाचे जाईल. सध्याची नोकरी सोडू नये. कामांमुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढती मिळेल. गृहसौख्य चांगले लाभेल. सर्वांशी नमते घ्यावे. या वर्षी तुम्हाला भरपूर यश मिळेल. वर्षाचा मधला काळ चांगला जाईल. तुमच्या कलदैवतेची उपासना करावी.
नव्या वर्षात तुम्हांला बढती मिळेल. नव्या नोकरीसाठी प्रयत्न केल्यास यश मिळेल. वरिष्ठांची मर्जी राहील. मोकळ्या वेळेत दुसरीकडे कामही मिळेल. एकंदरीत हे वर्ष तुम्हांला बरे जाईल. तब्येतीला जपावे. वादविवाद टाळावेत. संशयी वृत्तीमुळे नुकसान सोसावे लागेल. घरखर्चाचा मेळ बसेल. कुलदेवतेची उपासन करा.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या