मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Zodiac Signs : सासरीही निर्विवाद वर्चस्व गाजवतात 'या' राशीच्या मुली
या राशीच्या मुली सासरीही गाजवतात वर्चस्व
या राशीच्या मुली सासरीही गाजवतात वर्चस्व (हिंदुस्तान टाइम्स)

Zodiac Signs : सासरीही निर्विवाद वर्चस्व गाजवतात 'या' राशीच्या मुली

23 January 2023, 13:01 ISTDilip Ramchandra Vaze

Dominating Female Zodiac Signs : आज आपण अशाच काही राशींबद्दल जाणून घेणार आहोत. या मुलींना करिअर आणि आयुष्यात खूप यश मिळतं. लग्नानंतर सासरच्या घरातही तिचा दबदबा कायम असतो.

या राशीच्या मुली सासरीही गाजवतात वर्चस्व

ट्रेंडिंग न्यूज

ज्योतिष शास्त्रानुसार व्यक्तीच्या राशीच्या आधारे त्याचा स्वभाव आणि भविष्य समजते. एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर राशी आणि शासक ग्रहांचा प्रभाव देखील दिसून येतो. आज आपण अशाच चार राशींबद्दल जाणून घेणार आहोत.  या मुलींना करिअर आणि आयुष्यात खूप यश मिळतं. लग्नानंतर सासरच्या घरातही तिचा दबदबा कायम असतो. चला जाणून घेऊया ज्योतिष शास्त्रानुसार यामध्ये कोणत्या चार राशींचा समावेश आहे.

सासरी वरचष्मा गाजवणाऱ्या कोणत्या राशीच्या मुली असतात

मेष- ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीच्या मुली दिसायला अतिशय आकर्षक असतात. पण स्वभावाने त्या खूप वरचढ असतात. इतरांना त्यांच्या बोटांवर कसे फिरवायचे हे त्यांना चांगलंच माहित असतं. त्याच वेळी, त्यांचे सौंदर्य देखील लोकांना पूर्णपणे आकर्षित करते. या राशीच्या मुली फक्त प्रेमविवाहावर विश्वास ठेवतात आणि लग्नानंतर त्या मुलींचा नवराही तिच्याच सल्ल्याचे पालन करतो.

कन्या राशी- ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या मुली आपल्या पतीसाठी खूप भाग्यवान असतात. या मुली ज्या व्यक्तीशी लग्न करतात ती व्यक्ती खूप भाग्यवान मानली जाते. कन्या राशीच्या मुली खूप मोकळ्या मनाच्या असतात. आणि या कारणास्तव, तिला तिचे आयुष्य तिच्याच शैलीत जगणे आवडते. लग्नानंतर या मुली प्रत्येक कामात नवऱ्याला साथ देतात. आणि सासरच्या घरातही त्या आपल्या वागण्याने सर्वांना आपलसं करतात.

वृश्चिक- या राशीच्या मुलींना कोणाच्या सांगण्यानुसार चालणे आवडत नाही. तिला कोणाच्याही अधीन राहायचे नसते. त्यांच्या कामात इतर कुणाचीही ढवळाढवळ त्यांना आवडत नाही. असे मानले जाते की वृश्चिक राशीच्या मुली त्या घरावर राज्य करतात जिथे त्यांचे लग्न होते. मात्र, सासरच्या लोकांना खुश ठेवण्यासाठी या मुली काहीही करायला तयार असतात.

मकर- मकर राशीच्या मुलींना लग्नानंतर खूप प्रशंसा मिळते. सासरचे लोक त्याच्या बोलण्यावर खूप विश्वास ठेवतात. त्यांना प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या प्रकारे करायला आवडते. त्यांना कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा अजिबात सहन होत नाही. तिच्या या गुणामुळे पती आणि सासरे तिचा खूप आदर करतात.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

विभाग