शनिवार हा न्याय देवता शनिदेवाला समर्पित आहे. शनिदेव प्रत्येक व्यक्तीच्या कर्माची नोंद ठेवतात आणि त्यानुसार प्रत्येकाला फळ देतात. शनिदेव हा विलक्षण शक्ती असलेला देव आहे. ज्यांच्यावर शनिदेवाची कृपा असते त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळते.
सोबतच वय, आयुष्य, शारीरिक शक्ती, योग, वर्चस्व, ऐश्वर्य, कीर्ती, मोक्ष, नोकरी इत्यादींशी शनिचा संबंध आहे. हे सर्व विषय एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील शनीच्या स्थितीत विचारात घेतले जातात. शनिवार हा शनिदेवाच्या पूजेसाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो.
अशा स्थितीत शनिवारी काही विशेष उपाय केल्याने शनीची साडेसाती आणि प्रभावापासून आराम मिळेल. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल, तुमची कीर्ती आणि वैभव वाढेल आणि तुमच्या व्यवसायायतही भरभराट होईल.
१) जर तुम्हाला अर्थिक अडचणी दूर करायच्या असतील आणि अर्थिक नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आज म्हणजे शनिवारच्या दिवशी एक रुपायचे नाणे घ्या आणि त्या नाण्यावर मोहरीच्या तेलाचा एक ठिपका लावून शनि मंदिरात ठेवा. तसेच आर्थिक लाभ मिळण्यासाठी शनिदेवाची प्रार्थना करा.
२) समाजात प्रसिद्धी आणि मान सन्मान प्राप्त करायचा असेल तर पुढील उपाय तुम्हाला नक्की करायला हवा. यासाठी शनिवारी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून (ओम प्रं प्रेमं स: शनैश्चराय नमः।) या शनिदेवाच्या मंत्राचा ५१ वेळा जप करावा.
३) जर तुम्हाला प्रत्येक कामासाठी खूप संघर्ष करावा लागत असेल किंवा खूप मेहनत केल्यावरच यश मिळत असेल, तर हा उपाय करा. शनिवारच्या दिवशी मूठभर काळे तीळ घेऊन ते वाहत्या पाण्यात सोडा. तसेच शनिदेवाचे ध्यान करत प्रार्थना करावी.
४) जर तुम्हाला वडिलोपार्जित जमीन आणि मालमत्तेशी संबंधित कोणतीही समस्या येत असेल तर त्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी हा उपाय करा. शनिवारच्या दिवशी पिठाचा दिवा बनवा, त्यात मोहरीचे तेल टाका, त्यात वात टाका आणि शनिदेवासमोर दिवा लावा.
५) जर तुम्हाला कोणत्याही सरकारी कामात तुम्हाला अडचणी येत असतील तर या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी शनि स्तोत्राचे पठण करावे. दिवसभरात कधीही शनि स्तोत्राचे पठण करू शकता, परंतु हे लक्षात ठेवा की पाठ करताना तुमचे तोंड पश्चिमेकडे असावे कारण पश्चिम ही शनीची दिशा आहे.