मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Vastu Tips : तुमच्या बेडरूमध्ये आहेत का 'या' गोष्टी?, असल्यास आजच करा बाहेर!

Vastu Tips : तुमच्या बेडरूमध्ये आहेत का 'या' गोष्टी?, असल्यास आजच करा बाहेर!

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Aug 07, 2023 03:28 PM IST

Vastu Tips : वास्तुशास्त्रात घरातली कोणती गोष्ट कुठे असावी आणि कुठे नसावी याबाबत स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. बेडरूम ही आपली आराम करण्याची जागा असते. मात्र तिथेही काही गोष्टी असल्यास त्या आपल्यासाठी नुकसानदायक ठरू शकतात असं वास्तुशास्त्र सांगतं.

बेडरूममध्ये नसाव्या या गोष्टी
बेडरूममध्ये नसाव्या या गोष्टी (Pixabay)

वास्तुशास्त्रानुसार घरातच असलेल्या प्रत्येक गोष्टीत सकारात्मक आणि नकारात्मक उर्जा निर्माण होते. ज्याचा चांगला किंवा वाईट परिणाम घरातल्या सदस्यांवर होत असतो. अनेकदा घरातील वास्तुदोषाचा थेट परिणाम त्या व्यक्तींच्या जीवनावर होतो. कधीकधी हा परिणाम त्या घरातल्या प्रत्येक सदस्यावर झालेला पाहायला मिळतो.

ट्रेंडिंग न्यूज

दिवसभर काम करून थकल्यावर आपलं बेडरूम हे आपल्यासाठी स्वर्गापेक्षा कमी नसतं. दिवसभर काम करून थकलेल्या शरीराला आणि मनाला एक नवी उर्जा देण्याची गरज असते. रात्रीची एक चांगली झोप आपल्याला दुसऱ्या दिवसासाठी उर्जावान बनवते.

मात्र याच बेडरूमध्ये काही गोष्टी अशा असतात ज्या कधीही ठेवल्या जाऊ नये. मात्र आपण त्या गोष्टींकडे सर्रास दुर्लक्ष करतो आणि मग त्या वस्तू आपल्याला त्रास देण्यास कारणीभूत ठरतात. त्या वस्तू आपल्या बेडरूममध्ये असल्यावर आपली शांती भंग होते. मग तुमच्या बेडरूमम्ध्येही अशा वस्तू असल्यास त्यांना तात्काळ तिथून बाहेर काढा.

बेडरूमध्ये कोणत्या गोष्टी नसाव्यात?

बेडरुममध्ये मृत व्यक्तीचा फोटो कधीही लावू नका. बेडरूममध्ये पितरांची चित्रे ठेवल्याने झोपेचा त्रास होतो.

बेडरुममध्ये कधीही झाडू ठेवू नका. झाडू ठेवल्याने आरोग्य आणि नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम होतो. तसेच, झोपताना पर्स किंवा कोणतेही गॅझेट जवळ ठेवू नका.

औषधे, खाद्यपदार्थ किंवा कोणतीही अनावश्यक वस्तू डोक्याजवळ ठेवू नये. यामुळे झोपेत अडथळा येतो.

तुमच्या बेडरूममध्ये बेडसमोर कधीही आरसा किंवा ड्रेसिंग टेबल ठेवू नका. सकाळी उठल्याबरोबर आरशात पाहणे अशुभ मानले जाते. याचा परिणाम नातेसंबंधांवर होतो. तसेच यानं अपयशलाही तुम्ही सामोरे जाता. तुमच्या आयुष्यात दुर्दैव येतं.

बेडरूममध्ये तीक्ष्ण किंवा टोकदार वस्तू कधीही ठेवू नयेत. तसेच काटेरी रोपे लावू नयेत.

शूज आणि चप्पल कधीही बेडरूममध्ये ठेवू नका. उशीजवळ स्लीपर ठेवून झोपू नये. असे केल्याने जीवनात नकारात्मकता येते.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग