Diwali 2024: अनेक राशींसाठी दिवाळीचा काळ शुभ ठरणार आहे. १२ राशींपैकी या ५ राशींचे भाग्य दिवाळी दरम्यान आणि दिवाळी नंतर देखील चमकणार आहे. चला जाणून घेऊया, ज्या राशींना भाग्याची साथ लाभली आहे, अशा भाग्यशाली राशी कोणत्या आहेत…
वृषभ राशीच्या लोकांसाठी दिवाळीनंतरचा काळ चांगला राहील. या काळात या राशीच्या जातकांना व्यवसायात फायदा होईल. तुमच्या नशिबाचे कुलूप उघडू शकते. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर दिवाळीनंतर तुमची इच्छा पूर्ण होणार आहे.
सिंह राशीच्या लोकांसाठी दिवाळीचा हा काळ चांगला असेल. या काळात तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. दिवाळीनंतर तुम्हाला तुमच्या मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. कुटुंबासोबत घालवलेले क्षण तुमच्यासाठी आनंद घेऊन येणार.
मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ सुखाचा असेल. नशीब तुमच्यावर कृपा करणार आहे. तुमचे जवळच्या लोकांशी असलेले संबंध सुधारू शकतात. व्यवसाय आणि करिअरसाठी हा काळ उत्तम आहे. कामाच्या ठिकाणी लोकांचे सहकार्य मिळेल. लोक तुमच्या मदतीसाठी उभे राहू शकतात. प्रेमसंबंधात यश मिळेल.
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ आहे. तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. अनेक दिवसांपासून सुरू असलेला त्रास संपेल. जर तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर हा शुभ काळ आहे, तुम्हाला नफा मिळू शकतो.
दिवाळी हा सण अनेक महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे. हिंदू धर्मात दिवाळी सणाला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी आश्विन/कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला दिवाळीचा सण साजरा केला जातो. या वर्षी आमावस्या ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ०३ वाजून १२ मिनिटांनी सुरू होत आहे. ही आमावस्या १ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ०५ वाजून ५३ मिनिटांपर्यंत असणार आहे. उदया तिथी व्रतात किंवा सणात पाळली जाते. मात्र प्रदोष काळ दिवाळीत महत्त्वाचा मानला जातो.
आमावस्या १ नोव्हेंबरच्या संध्याकाळी समाप्त होत असली तरी प्रदोष काळ मात्र प्राप्त होणाह नाही. जेव्हा आश्विन आमावस्या प्रदोष काळापासून मध्यरात्रीपर्यंत असते, तेव्हा दिवाळी साजरी केली जाते. प्रदोष काळातच माता लक्ष्मीचे आगमन होत असते. यंदाची आमावस्या ही दोन दिवसांत विभागली गेली आहे. यामुळे जे लोक उदया तिथीला म्हणजेच सूर्य उगवल्यानंतरच्या तिथीला महत्त्व देतात ते १ नोव्हेंबर रोजी दिवाळी साजरी करतील. तर, जे लोक प्रदोष काळापासून मध्यरात्रीपर्यंत असणाऱ्या आमावस्येला महत्त्व देतात ते लोक ३१ ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी करतील.
संबंधित बातम्या