Divine Remedies on Problems: व्यक्तीवर अनेक प्रकारची संकटे येत असतात. अडथळे, समस्या आणि त्रास उद्भवत असतात. अशा वेळी मानवी प्रयत्नांसोबतच काही दैवी उपाय करणे आवश्यक असते. जाणून घेऊ या समस्या आणि त्यांवरील दैवी उपाय.
मेष, कर्क, सिंह आणि धनु राशींच्या नोकरदारांनी अथर्वशीर्ष वाचून श्री गणपतीची आराधना करावी. त्याच प्रमाणे नोकरदारांनी संकष्टी व्रत करावे.
वृषभ, कन्या, तूळ आणि कुंभ या राशींच्या नोकरदारांनी दूर्वा गणपतीव्रत करावे. संकष्टी चालू ठेवावी. श्री विष्णूच्या प्रतिमेचे पूजन करावे.
मिथुन, वृश्चिक, मकर आणि मीन राशीच्या नोकरदारांनी नियमीत श्री लक्ष्मी हृदय वाचावे. श्री विष्णूची उपासना करावी.
मेष, कर्क, धनु, मीन या राशींच्या जातकांनी आपल्या कुलदैवताची उपासना करावी. श्री दत्तात्रेयास नवस बोलावेत. दर पौर्णिमेला खेटे घालावेत.
वृषभ, कन्या, तूळ आणि कुंभ या राशींच्या जातकांनी दूर्वा गणपतीव्रत करावे. संकष्टी चालू ठेवावी. श्री विष्णूच्या प्रतिमेचे पूजन करावे.
मिथुन, सिंह, वृश्चिक आणि मकर या राशींच्या जातकांनी रुक्मिणी स्वयंवर वाचावे. श्री देवीची उपासना करावी. तुळशीत बाळकृष्ण ठेवून प्रदक्षिणा घालाव्यात.
मिथुन, सिंह, वृश्चिक आणि मकर या राशींच्या जातकांनी श्री गणेशाची उपासना करावी. संकष्टी व्रत धरावे. अथर्वशीर्ष पठण करावे.
मेष, कर्क, कन्या आणि मीन या राशींच्या जातकांनी श्रीलक्ष्मी सहस्त्रनाम वाचावे. भीमव्रताचे आचरण करावे. कुलदैवतेची आराधना करावी.
वृषभ, तूळ, धनु आणि कुंभ या राशींच्या जातकांनी भीमस्त्रोत वाचावे. कुलदेवतेची उपासना करावी.
मेष. कर्क, कन्या, धनु या राशीच्या जातकांनी गोपाळ सहस्त्रनामाचे वाचन करावे. त्याच प्रमाणे श्रीदेवी कवचाचे पठण करावे
वृषभ, सिंह, मकर, मीन या राशीच्या जातकांनी १६ सोमवार व्रत करावे. त्याच प्रमाणे भगवान शंकराला सोमवारी अभिषेक करावा.
मिथुन, तूळ, वृश्चिक आणि कुंभ या राशींच्या व्यवसायिकांनी, कारखानदारांनी आपल्या कुलदैवतेची आराधना करावी. त्याच प्रमाणे श्री सत्यनारायण व्रत करावे.
मिथुन, कर्क, सिंह आणि मकर या राशींच्या जातकांनी मृत्यूंजय जप करावा. श्री शंकराची आराधना करावी. तसेच श्री शनिमहात्म्य वाचावे.
वृषभ, तूळ, वृश्चिक आणि कुंभ या राशींच्या जातकांनी श्री गुरुचरित्र सप्ताह करावा, तसेच श्री दत्ताची उपासना करावी.
मेष, कन्या, धनु आणि मीन या राशींच्या जातकांनी सप्तशतीचे पठण करावे.
मेष, सिंह, कन्या आणि मकर या राशींच्या विद्यार्थ्यांनी कुलदैवतेवर श्रद्धा ठेवावी. तसेच मन लावून अभ्यास करावा.
वृषभ, मिथुन, तूळ आणि कुंभ राशींच्या विद्यार्थ्यांनी श्री गणेशाची उपासना करावी, तसेच गुरुवार व्रत करावे. अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.
कर्क, वृश्चिक, धनु आणि मीन राशींच्या विद्यार्थ्यांनी श्री दत्ताची उपासना करावी, तसेच श्री दत्ताचे दर्शन घ्यावे. पूर्ण एकाग्रतेने नियमित अभ्यास करावा आणि योग्य शिक्षकाकडे शिकवणी लावावी.
राहत्या घरी सुख लाभत नसल्यास खालील उपाय करावेत-
> आपल्या कुलदैवतेची उपासना ठेवावी.
> दरवर्षी आपल्या कुलदैवतेला अभिषेक करावा आणि घरातील सर्व सदस्यांनी कुलदैवतेचे दर्शन घ्यावे.
> प्रत्येक आमावस्येस दहीभाताचा नैवेद्य दाखवावा आणि नंतर तो आपल्या घरावर ठेवावा.
> संध्याकाळी घरात नारळ वाढवावा.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तसेच दैवी उपाय सुरू असताना डॉक्टरांकडूनही उपचार करून घ्यावेत. केवळ दैवावर हवाला ठेवून राहू नका.
संबंधित बातम्या