Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : रवि,शुक्र आणि शनिशी चंद्राचा योग घटीत होत असुन दिनमानावर विशेषत शनिचा प्रभाव राहील. धनु, मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा जाईल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!
आज शनिशी होणारा चंद्राच्या योग पाहता कलाकारांची कला बहरेल. लेखक कलावंतांना संधी मिळतील. कामातील बदल हा सुद्धा तुम्हाला काम करण्यासाठी उत्साहदायी ठरेल. उपासना करणार्यांना भक्ती आणि श्रद्धेची आर्द्रता जाणवेल. घरामध्ये मंगल कार्याची नांदी होईल. व्यवसाय असणार्यांना आपला धंदा वाढवण्यासाठी चांगले ग्रहमान आहे. संततीसंबंधी तुमचे विचार वेगळे असतील परंतु तुमच्या मताशी मुलं सहमत होतीलच असे नाही. घरातील काही प्रश्नांसाठी एकत्र तोडगे काढावे लागतील. व्यवसायातून जुनी येणी वसूल विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे योग येतील. मन प्रसन्न राहिल. बोलण्यातील संभ्रम मात्र दुर ठेवा. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव राहिल. स्वतःच्या मनाने विचारा अंतीच निर्णय घ्या. आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल.
शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०७.
आज अनुकूल ग्रहयुतीत तुमच्या उत्तम बुद्धी मत्तेचा योग्य वापर कराल. एखादा धाडसी निर्णय पथ्यावर पडेल. नवीन योजना राबविण्यात यशस्वी व्हाल. उच्च शिक्षण घेणारांना योग्य संधी मिळतील. नवीन विचारांचा पाठपुरावा कराल. झालेले बदल जितके लवकर आत्मसात कराल तेवढा यशाचा आलेख उंचावेल. मनोबल उंचावलेले असेल. औद्योगिक क्षेत्रातील प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. नवीन भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल.
शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०२, ०८.
आज चंद्राचं मंगळाच्या नक्षत्रातुन होणार भ्रमण पाहता विचार पूर्वक निर्णय घ्या. थोडी संघर्षात्मक विरोधात्मक परिस्थिती घरात आणि घराबाहेर निर्माण होऊ शकते. दीर्घकाळ रेंगाळणाऱ्या व्याधींना तोंड द्यावे लागेल. घरातील मोठ्या व्यक्तींशी न पटल्यामुळे ताणतणाव जाणवेल. बौद्धीक कसरतीपेक्षा युक्तीने काही गोष्टी केल्या तर यश मिळू शकेल. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलो पार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे. आईच्या प्रकृतिकडे लक्ष दयावे. पराक्रम व क्षमतेमुळे यश व फायदा होईल. व्यापार उद्योगात प्रगती राहिल. खर्च मात्र विचार करून करा. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल. कुंटुंबासोबत तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळण्याचे योग आहेत.
शुभरंग: जांभळा, शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०७, ०८.
आज वरियान योगात सुविधा मिळाल्यामुळे कामाचा दर्जा वाढवण्यावर तुमचा भर राहील. संतुलित विचाराचा पाठपुरावा करण्याच्या तुमच्या स्वभावाचा तुम्हाला फायदा होणार आहे. फक्त रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणत्याही प्रश्नाची उकल तुमच्याकडून फार चांगली होत असल्यामुळे अनेक जणांचे सल्लागार बनाल. मानसिक अवस्था उत्तम राहणार आहे. मात्र अतिउत्साह व अतिरेकपणा मात्र टाळावा. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न सफल होतील. मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. व्यापारात भागीदारीत कायदा होण्याचे योग आहेत. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आज भरभरटीचा दिवस आहे. नवीन प्रस्ताव हाती येतील. कामे पूर्णत्वास जातील. व्यवहारिक समस्या दूर होतील.
शुभरंग: पिवळसर, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०४, ०६.
संबंधित बातम्या