मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar kumbh Meen Rashi Today : मकर राशीच्या लोकांना कामाचा दबाब राहील! वाचा चारही राशींचे भविष्य!

Dhanu Makar kumbh Meen Rashi Today : मकर राशीच्या लोकांना कामाचा दबाब राहील! वाचा चारही राशींचे भविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 08, 2024 01:48 PM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction today 8 march 2024 : आज ८ मार्च २०२४ रोजी, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल शुक्रवारचा दिवस? वाचा चारही राशींचे राशीभविष्य!

धनु, मकर, कुंभ, मीन
धनु, मकर, कुंभ, मीन

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : शनिचा केतुशी संयोग होत असुन शिव पुजन आणि शिव योगात धनु, मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा जाईल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!

धनुः 

आज आयुष्यातील जोडीदाराकडून आपणास अनुकूल असे सहकार्य लाभणार आहे. मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. इतरांना खूप सहकार्य कराल. नावलौकिक वाढेल. लेखकांच्या लिखाणास गती मिळेल. व्यवसायात उत्तम नियोजनामुळे एक प्रकारची शिस्त असेल. तरुणांच्याआवडी निवडी बदलत राहतील. नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहात. व्यापारात थोड्याफार अडचणी निर्माण होतील. हाती कमी पैसा असल्याने योजना अपूर्ण राहाण्याची शक्यता आहे. वास्तविकतेला महत्व देणे गरजेचे आहे. कुटुंबातून सहकार्य लाभेल. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. लाभदायक घटना घडतील. नातेवाईकां कडून सहकार्य लागेल. नोकरदारांना वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. महत्वाची कामे तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या वेळेस पुर्ण होतील. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

शुभरंग: पिवळसर, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०५.

मकरः 

आज आपणास विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. थोडे आस्थिर आणि चंचलं बनाल. व्यवसायात मनावर ताबा ठेवावा लागेल. हट्टी आणि दुराग्रही स्वभावामुळे जवळच्या लोकांची मने दुखावली जाण्याची शक्यता आहे. मुलांशी थोडे मतभेद संभवतात. गुप्तशत्रुपासुन पिडा उत्पन्न होण्याची शक्यता आहे. ताणतणाव वाढेल. हातून चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. नोकरीत बदलाचे निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांकडून कामाचा दबाब राहील. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. अंहकार आणी मोठेपणामुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. प्रत्येक व्यवहार काळजीपूर्वक करा. अन्यथा मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. कायदेशीर पेचप्रसंगात अडकले जाण्याची शक्यता आहे. कायदा व नियमच्या विरोधात काम केल्यास शिक्षा होण्याची शक्यता आहे. नेहमीच्या कामात खुप मेहनत घ्यावी.

शुभरंगः जांभळा, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०२, ०७.

कुंभः 

आज आपणास अनपेक्षीत आंनदाची बातमी मिळेल. आजूबाजूच्या जगात व्यवहारामध्ये चौकसपणा ठेवलात तर फायद्याचे ठरेल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. जवळच्या माणसांची परिस्थिती समजाऊन घ्यावी लागेल. जोडीदाराच्या मनाचा विचारही करावा लागेल. संततीसाठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल. आपल्या कार्यक्षेत्रात वाढ होईल. आयुष्यातील जोडीदाराकडून आपणास अनुकूल असे सहकार्य लाभणार आहे. नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहे. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. प्रवासातून आज लाभ होणार आहे. साहित्य कला क्षेत्रातील मंडळीना फारच चांगला फलदायी दिवस आहे. मान-सन्मान प्रतिष्ठा प्राप्त वाढेल. कर्तुत्वात वाढ होईल. कार्यक्षेत्र विस्तारेल. व्यापारी वर्गाला आर्थिक फायदयाचा दिवस आहे. आज आनंदी व ऊत्साही दिवस राहील. मनात प्रसन्नता असेल. आईच्या आरोग्याची काळजी मात्र घ्या.

शुभरंगः निळा, शुभदिशाः नैऋत्य, शुभअंकः ०५, ०९.

मीनः 

आज आपणास कामाच्या ठिकाणी मानसन्मान मिळेल. आर्थिक स्थिती बरी राहिली तरी ऐपत असूनही काही गोष्टींबाबत निरीच्छ रहाल. सर्व बाबतीत मागचा अनुभव पाठीशी घेऊन निर्णय घ्याल. स्वत:चे सामर्थ्य ओळखून वाटचाल कराल. चिकाटी जिद्द आणि स्थैर्य कामी येईल. नोकरीत कर्तुत्वाला चांगली संधी निर्माण होईल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. आपले कर्तुत्व सिद्ध झाल्याने जनमानसात प्रतिष्ठा वर्चस्व प्रस्थापित कराल. व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता आहे. नवनवीन योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या भांवडाकडून उत्तम सहकार्य लाभेल. अचानक लाभ होतील. कौटुंबिक वातावरण चांगले व आनंददायी रहिल. कुटुंबातुन विशेष सहकार्य लाभेल. ग्रंथ लिखाणास उत्तम दिवस आहे. विद्याभ्यासात प्रगती राहिल. संशोधनपर कार्यात मानसन्मान मिळेल.

शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०५, ०९.

WhatsApp channel