Dhanu Makar kumbh Meen Rashi Today : मकर राशीच्या लोकांनी घेतलेले निर्णय योग्य राहतील! वाचा चारही राशींचे भविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar kumbh Meen Rashi Today : मकर राशीच्या लोकांनी घेतलेले निर्णय योग्य राहतील! वाचा चारही राशींचे भविष्य!

Dhanu Makar kumbh Meen Rashi Today : मकर राशीच्या लोकांनी घेतलेले निर्णय योग्य राहतील! वाचा चारही राशींचे भविष्य!

Apr 08, 2024 10:07 AM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction today 8 April 2024 : आज ८ एप्रिल २०२४ रोजी, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल सोमवारचा दिवस? वाचा चारही राशींचे राशीभविष्य!

धनु, मकर, कुंभ आणि मीन
धनु, मकर, कुंभ आणि मीन

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : आज अहोरात्र ऐंद्र योग आहे. चंद्रमा शुक्र-शुक्र नेपच्युनशी योगही करत आहे. धनु, मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा जाईल सोमवती अमावस्येचा आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!

धनु: 

आज ग्रहांचा प्रतियोग पाहता करिअरमध्ये तुमच्या चपळ कार्यक्षमतेमुळे आपापल्या कार्यक्षेत्रात एक वेगळाच ठसा तुम्ही उतरवणार आहात. जोडीदाराची साथ चांगली मिळेल. नवीन घर स्थावर खरेदीचे योग येऊ शकतात. तुमचे एखाद्या विषयामध्ये जेवढे ज्ञान असेल त्याप्रमाणे पैसा निश्चित मिळणार आहे. त्या दृष्टीने पुढे जायला हरकत नाही. व्यवसायात मनाप्रमाणे कामे मिळतील. व्यावसायिक किवा खाजगी कामासाठी प्रवास घडेल. अनुकुल फळ प्राप्त होतील. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता योग आहे. व्यापारी वर्गासाठी बर्‍याच संधी प्राप्त होतील. व्यापारात नवीन बदल प्रयोग यशस्वी ठरतील. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. व्यवसायातील यश मिळाल्याने आनंदी रहाल.

शुभरंगः पिवळसर, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०३, ०५.

मकरः 

आज चंद्र आणि शुक्र-नेपच्युन योगात नवीन योजना यशस्वी होतील. थोडे धाडस दाखवा. आपल्या महत्त्वाकांक्षी योजनांचे नियोजन चाणाक्षपणे कराल व त्यात यशस्वी व्हाल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. सहलीचे बेत ठरतील. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित होईल. उद्योग व्यापारात अर्थिक स्तोत्र निर्माण होतील. व्यापारात आर्थिक लाभ नक्की होणार आहे. मनइच्छित फळ मिळणार आहे. कुटूंबात स्नेह वाढेल. कुटुंबातून आपल्या कार्यास प्रोत्साहन मिळेल. स्वभावा तील रागावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस यशप्राप्तीचा आहे मोठे आर्थिक व्यवहार करण्यास उपयुक्त दिवस आहे. आनंदाची बातमी मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात नावलौकिकता प्राप्त होईल. नोकरीत आपण घेतलेले निर्णय योग्य राहतील. कौटुंबिक स्नेह निर्माण होईल.

शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०५, ०८.

कुंभ: 

आज चंद्र भ्रमणात उत्साही राहिल्यामुळे सहवासात येणाऱ्यांनाही आनंदी करून जाल. घर सजवण्याचे स्वप्न साकार होईल. घरात उंची वस्तूंची खरेदी कराल. मुलां कडून त्यांच्या धाडसाचे कौतुक ऐकायलामिळेल. धंद्यात वाढ होईल. राजकारणी लोकांना आपला मान जपण्या साठी संपर्क वाढवावा लागेल. कष्टाच्या मानाने लाभ कमी मिळेल. परंतु नोकरी व्यवसायात मात्र आपला वेगळा ठसा उमटवाल. रोजगारात तुमची प्रगती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यापार वर्गाची व्यवसायात वाढ होईल. तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. तुमची पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. कलाक्षेत्रातील महिला अनुकूल प्रगतीच शिखर गाठतील. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेने अधिक लाभ होईल. भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे.

शुभरंग: जांभळा, शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०४, ०७.

मीन: 

आजच चंद्रबल अनिष्ट असल्याने अंहकारी वृत्तीमुळे यांचे नुकसान होऊ शकते. वैवाहिक जीवनात ताणतणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. अती भावनाप्रधानतेमुळे मात्र मनःस्तापाचे प्रसंग येतील. आलेला पैसा ताबडतोब गुंतवणूक करणे हिताचे ठरेल. मुलाच्या बाबतीत वाजवी पेक्षा जास्तच विचार कराल. कुटुंबातील आपसातील मतभेद वाढू नयेत याची काळजी घ्या. कोणताही विषय जास्त ताणू नये. विचारपूर्वक नियोजन करून कार्य करा. नोकरी व्यापारात आर्थिक प्राप्तीसाठी खुप झगडावे लागेल. स्पर्धकांच्यावर लक्ष ठेवा. हितशत्रु गुप्तशत्रूचा त्रास जाणवेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना लोकांचा विरोध असहकार्य लाभेल. मानसिक शारिरिक थकवा जाणवेल. मित्रमैत्रिणी बरोबर युक्तिवाद टाळावेत. मनात असंतोष निर्माण होईल.

शुभरंगः पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०३, ०९.

Whats_app_banner