Dhanu Makar kumbh Meen Rashi Today : धनु राशीच्या लोकांनी कोर्टकचेरीचे प्रसंग सध्या टाळा! वाचा चारही राशींचे भविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar kumbh Meen Rashi Today : धनु राशीच्या लोकांनी कोर्टकचेरीचे प्रसंग सध्या टाळा! वाचा चारही राशींचे भविष्य!

Dhanu Makar kumbh Meen Rashi Today : धनु राशीच्या लोकांनी कोर्टकचेरीचे प्रसंग सध्या टाळा! वाचा चारही राशींचे भविष्य!

Apr 05, 2024 12:17 PM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction today 5 April 2024 : आज ५ एप्रिल २०२४ रोजी, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल शुक्रवारचा दिवस? वाचा चारही राशींचे राशीभविष्य!

धनु, मकर, कुंभ, मीन
धनु, मकर, कुंभ, मीन

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : चंद्र मंगळ आणि शनिशी संयोग करीत आहे. साध्य आणि शुभ योगात धनु, मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा जाईल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!

धनुः 

आज शुभ योगात तुमच्या अत्यंत सौम्य व शांत स्वभावाचा फायदा कोणी घेत नाही ना याकडे लक्ष द्या. घरामध्ये कोणाच्याही आजार पणासाठी पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. संततीच्या बाबतीत दोन पिढ्यां मधील संघर्ष अनुभवाल. इथे सुवर्णमध्य काढावा लागेल. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक प्रगती करण्याच्या विचाराबरोबर आपण आपले आरोग्यही जपा. व्यवसायिकांना व्यवसायासाठी अडचणीतून मार्ग काढावा लागेल. शुल्लक कारणांवरुन मानसिक भिती आपणास वाटेल. प्रेमिकांना एकमेकां च्या वागण्यामुळे मानसिक त्रास होईल. आपले विचार कमी जुळतील. कोर्टकचेरीचे प्रसंग सध्या टाळावेत. प्रकृतिकडे दुर्लक्ष करुन जमणार नाही. प्रवासात काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०५, ०८.

मकरः 

आज चंद्रबल अनुकूल राहिल. व्यवसायात नुसते ज्ञान असून चालणार नाही तर ते कोणत्या पद्धतीने वापरावे याचाही अभ्यास करावा लागेल. व्यवसायात कोणत्या गोष्टी केल्या असता आपली प्रगती होऊ शकते याचा खोलवर अभ्यास करा. वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घ्याल. त्यामुळे थोडी शांतता मिळेल. व्यवहारात नवनवीन गोष्टींचे जरा जास्तच आकर्षण राहील. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. परिस्थितीवर मात करण्यासाठी अनुत्साही न होता जोमाने चिकाटीने प्रयत्न करावे. अपेक्षित संपादन करता येईल. व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. शेअर्समध्ये अथवा कमी कालावधीची गुंतवणूक करताना ती विचार पूर्वक करणे गरजेचे राहील. परंतु दुसऱ्यांना मदत करताना सावध गिरी बाळगा. अर्थिक व्यवहार करताना गुंतवताना तात्पुरता फायदा लक्षात घेऊ नये. संततीकडून सर्व दृष्ट्या आनंददायक बातम्या मिळतील.

शुभरंग: जांभळा, शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०१, ०८.

कुंभः 

आज चंद्र शनिशी योग करत आहे. थोडा तापट स्वभाव सगळ्यावर पाणी पाडू शकतो. घरामध्ये जास्तीत जास्त वेळ द्यावा लागेल. व्यवसायात परिस्थितीचा साधक बाधक विचार करून निर्णय घ्यावा. अती संवेदन शील स्वभावामुळे प्रत्येक गोष्टीचा उगाचच विचार करीत रहाल. आत्मविश्वास आणि उत्साहाचा भाग कमी राहील. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना काळ अनुकूलच आहे. कर्ज फेड करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. विद्यार्थ्यांनी आळसापासून दूर रहावे. मनासारख्या घटना घडण्यास पूरक दिवस आहे. आपल्या ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. सरकारी संदर्भातील व्यक्तींना देखील बढती मिळण्याचे योग आहेत. आर्थिक आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. जोडीदाराशी कुटुंबातील वातावरण एकंदरीत समाधानी राहील. गायन कलाकारांना प्रसिद्धीचे योग आहे. आपले आरोग्य मानसिक समाधानामुळे उत्तम राहणार आहे.

शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०५, ०८.

मीनः 

आज ग्रहयोग अनुकूल आहेत. नोकरी व्यापारात सरकारी कामकाजामुळे काही कामे अडली असतील तर ती पूर्ण होतील. काही सवलती मिळायच्या असतील तर त्या मिळून जातील. व्यवसायात गिऱ्हाईकांना आकर्षित करण्यासाठी खास योजना आखाल. वरिष्ठांची मर्जी झाल्यामुळे प्रमोशनही मिळू शकते. रहाणीमान उंचावण्यासाठी बराच पैसा खर्ची टाकाल. विद्यार्थ्यांचा तणाव कमी होईल. सार्वजनिक कार्यात पतप्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल. युवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नव नविन संधी आपल्याला मिळणार आहेत. कलाकारांना त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यास ग्रहमान अनुकूल आहेत. मेहनत वाढवावी लागणार आहे. जबाबदारीने काम करा. त्याच बरोबर वेळेचे नियोजन असेल तर योग्यच फायदा होईल.

शुभरंगः पिवळसर, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०१, ०९.

Whats_app_banner